Join us  

Tata Technologies ची बंपर लिस्टिंग; पहिल्यांदाच टाटा ग्रुपचे मार्केट कॅप 26 लाख कोटींच्या पुढे

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 9:14 PM

19 वर्षांनंतर Tata समूहातील कंपनीची लिस्टिंग झाली आणि पहिल्याच दिवशी कंपनीने दमदार कामगिरी केली.

Tata Technologies Share Market Listing:टाटा समूहाच्या Tata Technologies IPO ची शेअर बाजारात बंपर लिस्टिंग झाली. 19 वर्षांनंतर आलेल्या टाटा समूहाच्या या शेअरने अपेक्षेपेक्षा चांगले पदार्पण केले. दमदार लिस्टिंगमुळे टाटा समूहाचे मार्केट कॅप पहिल्यांदाच 26 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. हा शेअर NSE वर 140% च्या प्रीमियमवर, Rs 1200 वर लिस्ट झाला. पहिल्या ट्रेडिंग सत्रात शेअर इश्यू किमतीच्या तुलनेत 162% वाढीसह 1313 रुपयांवर बंद झाला.

Tata Technologies चे मार्केट कॅप 53300 कोटी रुपयांच्या पुढे इंट्राडे ट्रेडिंगदरम्यान टाटा टेक्नॉलॉजीजचा शेअर 1400 रुपयांवर पोहोचला होता. यामुळे कंपनीचे मार्केट कॅप 53300 कोटी रुपये झाले आहे. टाटा समूहाच्या 29 कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. 30 नोव्हेंबरच्या क्लोजिंगनुसार, टाटा समूहाची सर्वात मौल्यवान कंपनी TCS आहे, जिचे मार्केट कॅप रु. 12.85 लाख कोटी आहे.

यानंतर टायटनचा क्रमांक लागतो, ज्याचे मार्केट कॅप 3.04 लाख कोटी रुपये आहे. टाटा मोटर्सचे मार्केट कॅप 2.61 लाख कोटी रुपये, टाटा स्टीलचे मार्केट कॅप 1.56 लाख कोटी रुपये, ट्रेंटचे मार्केट कॅप 95175 कोटी रुपये, टाटा पॉवरचे 87328 कोटी रुपये, कंज्युमर प्रोडक्ट 86705 कोटी रुपये आहेत.

काय म्हणतात कंपनीचे CEO?टाटा टेक्नॉलॉजीच्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी चांगला नफा झाला आहे. 15000 रुपयांच्या गुंतवणुकीवर, गुंतवणूकदारांनी एका लॉटवर 21000 रुपयांचा नफा कमावला आहे. कंपनीचे सीईओ वॉरन हॅरिस यांनी एका हिंदी वाहिनीशी बोलताना कंपनीच्या भविष्यातील योजना आणि बिझनेस मॉडेलबद्दल सांगितले. कंपनीकडे भरपूर काम असून आगामी काळात ही गती कायम ठेवण्यावर भर असल्याचे सीईओंचे म्हणने आहे. 

 

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक