Tata Group Share : टाटा समूहाचे शेअर्स गुंतवणूकदारांना चांगला परतावा देतात. आता टाटा समूहाच्या आणखी एका शेअरने गुंतवणूकदार मालामाल झाले आहेत. टायटन कंपनीचा शेअर 1.50 रुपयांनी वाढून 2500 रुपयांवर आला. टायटनच्या शेअर्समध्ये पैसा गुंतवून ज्यांनी संयम ठेवला ते कोट्यधीश झाले आहेत. काही वर्षांपूर्वी टायटनच्या शेअर्समध्ये एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार आता करोडपती झाले आहेत. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांनीही टायटनचे अनेक शेअर्स खरेदी केली होते.
1 लाखाचे झाले 33 कोटी 21 सप्टेंबर 2001 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) वर 1.50 रुपये होते. एखाद्या व्यक्तीने 21 सप्टेंबर 2001 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला त्यावेळी 66,666 शेअर्स मिळाले असते. टायटनने जून 2011 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर जारी केले होते. म्हणजेच कंपनीने प्रत्येक 1 शेअरमागे 1 बोनस शेअर दिला. ज्या व्यक्तीने 1 लाख रुपये गुंतवले, त्यांना बोनस मिळाल्यानंतर एकूण 133,332 शेअर्स झाले. टायटनचे शेअर्स मंगळवार, 21 मार्च 2023 रोजी रु.2514 वर बंद झाले. त्यामुळे सध्या 133,332 शेअर्सचे मूल्य 33.51 कोटी रुपये झाले असते.
12 वर्षात 1 लाख रुपयांचे 26 लाख रुपये झाले1 एप्रिल 2011 रोजी टायटन कंपनीचे शेअर्स BSE वर रु.192.83 वर व्यवहार करत होते. जर एखाद्या व्यक्तीने 1 एप्रिल 2011 रोजी टायटनच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये गुंतवले असतील तर त्याला आज 26.04 लाख रुपये मिळाले असते. दिग्गज गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला यांच्याकडे टायटनमध्ये 45,895,970 शेअर्स किंवा 5.17% हिस्सा आहे. डिसेंबर 2022 च्या तिमाहीसाठी टायटनची ही शेअरहोल्डिंग आहे. टायटनमध्ये तामिळनाडू इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा 27.88 टक्के हिस्सा आहे.
डिस्केमर: आम्ही फक्त स्टॉकच्या कामगिरीबद्दल माहिती दिली आहे, हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक जोखमीच्या अधीन असते, त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.