Join us

Tata ग्रुपचा मल्टीबॅगर शेअर; सहा महिन्यात दुप्पट, तर वर्षभरात दिला तिप्पट परतावा...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2024 3:25 PM

Tata Trent Share Multibagger Return: वर्षभरापूर्वी 1406 रुपयांवर असलेला हा शेअर आता 4,640 वर पोहोचला आहे.

Tata Trent Share Multibagger Return : स्वयंपाकघरातील मिठापासून ते विमानापर्यंत...प्रत्येक ठिकाणी तुम्हाला 'टाटा' नाव दिसेल. देशातील सर्वात जुन्या उद्योग घराण्यांपैकी एक असलेल्या टाटा समूहाचा (Tata Group) व्यवसाय सर्वच क्षेत्रात पसरलेला आहे. दरम्यान, टाटा ग्रुपमध्येच सामील असलेल्या ट्रेंट लिमिटेड(Trent Ltd) कंपनीचे शेअर्स गुंतवणूकदारांसाठी मल्टीबॅगर ठरले आहेत. या शेअरने अवघ्या सहा महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट तर वर्षभरात तिप्पट केले आहेत.

रॉकेट वेगाने उडाले शेअर्सट्रेंट लिमिटेड, या कंपनीच्या नावासोबत 'टाटा' नाव जोडलेले नाही. ही कंपनी ज्युडिओ आणि ट्रेंट हायपरमार्केट चालवते. रिटेल, फॅशन आणि ब्युटी प्रोडक्ट क्षेत्रात कंपनीची चांगली पकड आहे. रिपोर्ट्सनुसार, 232 वेस्टसाइड स्टोअर्सशिवाय कंपनीचे देशभरात 545 ज्युडिओ स्टोअर्स आहेत. कंपनीचे शेअर्स दररोज मोठी झेप घेत आहे. गुरुवारीदेखील ट्रेंट लिमिटेडचा शेअर 5.22 टक्क्यांनी किंवा 230.15 रुपयांच्या वाढीसह 4,640 रुपयांवर पोहोचला.

सहा महिन्यांत 108% परतावाट्रेंटच्या शेअर्सच्या कामगिरीवर नजर टाकल्यास, 1.62 लाख कोटी रुपयांचे बाजार भांडवल असलेल्या या कंपनीच्या शेअर्सने अल्पावधीतच गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. गेल्या पाच दिवसांत या शेअरची किंमत 8 टक्क्यांनी वाढली आहे, तर गेल्या सहा महिन्यांत या शेअरमध्ये गुंतवलेल्या पैशाची रक्कम दुप्पट केली आहे. 6 महिन्यांत ट्रेंट शेअरने गुंतवणूकदारांना 108 टक्के परतावा दिला आहे. 2 नोव्हेंबर 2023 रोजी एका शेअरची किंमत 2189 रुपये होती, जी आता 4,640 रुपयांवर पोहोचली आहे.

एका वर्षात 1 लाख रुपयांचे झाले 3 लाख रुपये टाटाच्या या शेअरने सहा महिन्यांत गुंतवणूकदारांची रक्कम दुप्पट, तर वर्षभरात तिप्पट केली आहे. एका वर्षापूर्वी, 2 मे 2023 रोजी ट्रेंट लिमिटेडच्या शेअरची किंमत 1406 रुपये होती, जी आता 4,640 रुपये झाली आहे. यादरम्यान या शेअरने 224.40 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला. ज्या गुंतवणूकदारांनी गेल्यावर्षी या शेअरने 1 लाख रुपये गुंतवले असतील, त्याची रक्कम आज 3 लाखांपेक्षा जास्त झाली असेल.

(टीप-शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक