टाटा समूहाची कंपनी असलेल्या टाटा टेलीसर्व्हिसेस लिमिटेड, म्हणजेच टीटीएमएलच्या (TTML) शेअरमध्ये मंगळवारी जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरमध्ये आज 7.37% एवढी तेजी दिसून आली. हा शेअर आज 76.32 रुपये या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला होता. हा शेअर सध्या आपल्या 52 आठवड्यांतील 149.95 रुपयांच्या उच्चांका पेक्षा 49% घसरलेला आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 49.80 रुपये एवढा आहे.
शेअर प्राइस हिस्ट्री -
टीटीएमएलचा शेअर बीएसईवर गेल्या वर्षभरापासून सातत्याने तोट्यात आहे. या शेअरमध्ये वर्षभरात 37.52 टक्क्यांची घसरण झाली आहे. या वर्षात YTD मध्ये या शेअरमध्ये 18.63 टक्क्यांची घसरण झाली. मात्र गेल्या एका महिन्यात हा शेअर 15.99% वधारला आहे. टाटा समूहाचा हा शेअर 11 जानेवारी 2022 रोजी आपल्या सर्वकालीन उच्च पातळीवर म्हणजेच 291.05 रुपयांवर होता. आता हा शेअर आपल्या सर्वकालीन उच्च पातळीपेक्षा 73.77% खाली आहे.
कंपनीचा व्यवसाय काय?
TTML ही टाटा टेलिसर्व्हिसेसची उपकंपनी आहे. ही कंपनी तिच्या सेगमेंटमध्ये मार्केट लिडर आहे. ही कंपनी व्हॉईस, डेटाची सर्व्हीस प्रोव्हाईड करते. कंपनीच्या ग्राहकांच्या यादीत अनेक मोठी नावे आहेत. तसेच कंपन्यांना क्लाउड आधारित सुरक्षा सेवा आणि वेगवान इंटरनेटसह ऑप्टिमाइझ्ड नियंत्रण मिळत असल्याने याला मोठा प्रतिसाद आहे.