Join us

टाटाच्या या कंपनीनं रचला इतिहास, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; ₹4300 पार जाऊ शकतो शेअर! 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2024 3:33 PM

आता कंपनीचे मार्केट कॅप ₹ 15 लाख कोटींच्याही पुढे गेले आहे. महत्वाचे म्हणजे, मंगळवारी सलग पाचव्या दिवशी या शेअरमध्ये वाढ झाली आहे.

टाटा समूहाची आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस अर्थात TCS लिमिटेडचा ​शेअर मंगळवारी इंट्राडे ट्रेडमध्ये 4% पेक्षाही अधिक वधारला होता. याशेअरने ₹ 4140 हा 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. आता कंपनीचे मार्केट कॅप ₹ 15 लाख कोटींच्याही पुढे गेले आहे. महत्वाचे म्हणजे, मंगळवारी सलग पाचव्या दिवशी या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तत्पूर्वी या शेअरने 2021 मध्ये ₹ 4,123 चा विक्रमी उच्चांक गाठला होता.

रिलायन्सनंतर, टीसीएस सर्वात महाग कंपनी -मार्केट कॅपचा विचार करता, TCS ही ₹15 लाख कोटींहून अधिकच्या मार्केट कॅपसह भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात महागडी कंपनी आहे. तर मुकेश अंबानी यांची रिलायन्स इंडस्ट्रीज पहिल्या क्रमांकावर आहे. रिलायन्सचे मार्केट कॅप जवळपास ₹ 20 लाख कोटी एवढे आहे.

महत्वाचे म्हणजे, टाटा समूहाच्या एकूण एमकॅपमध्ये टीसीएसचे योगदान डिसेंबर 2023 मध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये पहिल्यांदाच अर्ध्याहून कमी झाले होते. याचे मुख्य कारण होते स्टॉकचा खराब परफॉरमन्स याशिवाय टायटन, टाटा मोटर्स, ट्रेंट, टाटा पॉवर, इंडियन होटेल्स आणि टाटा एलेक्सी सारख्या टाटा समूहाच्या शेअरचे उतकृष्ट प्रदर्शन.

काय म्हणतायत ब्रोकरेज -टीसीएस लक्ष ठेवणारे 44 अॅनालिस्टपैकी 10 जनांनी स्टॉकवर "विकण्या"चे रेटिंग दिले आहे. तर 23 जनांनी "खरेदी" करण्याची शिफारस केली आहे. ब्रोकरेज फर्म Religare Broking नुसार, टीसीएसचा शेअर 4,359 रुपयांवर जाऊ शकतो. ब्रोकरेज फर्मने या स्टॉकवर 'बाय' रेटिंग दिले आहे. महत्वाचे म्हणजे, फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत टीसीएसच्या शेअरमध्ये 8% टक्क्यांची वाढ झाली आहे आणि गेल्या वर्षातील नोव्हेंबर महिन्यापासून यात सातत्याने वाढ होत आहे.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :टाटाशेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक