Share Market: शेअर बाजारातगुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. या आठवड्यात सर्वांच्या नजरा आयटी कंपन्यांवर असणार आहेत. याचे कारण म्हणजे, या आठवड्यात कंपन्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर करणार आहेत. यापैकी एका कंपनीवर गुंतवणूकदारांचे विशेष लक्ष असेल. ही कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS share) आहे. तज्ज्ञांचे मत आहे की, कंपनीचे शेअर्स 3615 रुपयांच्या पातळीवर जातील.
आयटी क्षेत्रावर मंदीचे सावटशेवटची तिमाही माहिती तंत्रज्ञान क्षेत्रासाठी (IT) फारशी अनुकूल ठरली नव्हती. अमेरिकेतील बँकिंग क्षेत्रातील अस्थिरतेसोबतच युरोपीय देशांमधील महागाईचा वाईट परिणाम टीसीएससह इतर कंपन्यांच्या तिमाही निकालांवर स्पष्टपणे दिसून आला. मंदीच्या चर्चेमुळे आयटी क्षेत्र हादरले आहे. याच कारणामुळे या कंपन्यांच्या शेअर्समध्येही घसरण झाली आहे.
बिझनेस टुडेच्या अहवालानुसार, IDBI कॅपिटल मार्केट्सने टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या स्टॉकला होल्ड रेटिंग दिले आहे. ब्रोकरेज फर्मला विश्वास आहे की, कंपनीचे शेअर्स 3615 रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकतात. गुरुवारी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसच्या शेअरची किंमत 0.65 टक्क्यांनी घसरून 3218.90 रुपयांच्या पातळीवर बंद झाली.
कंपनीची स्थिती कशी आहे?यावर्षी आतापर्यंत टाटा समूहाच्या या कंपनीच्या शेअर्समध्ये 1.30 टक्क्यांची घसरण झाली आहे. या कालावधीत NSE 4.12 टक्क्यांनी घसरला आहे. ज्या गुंतवणूकदारांनी एक वर्षापूर्वी टीसीएसचे शेअर्स खरेदी केले होते, त्यांचे 12 टक्क्यांहून अधिक नुकसान झाले आहे. TCS चा 52 आठवड्यांचा उच्चांक 3809.30 रुपये प्रति शेअर आहे आणि 52 आठवड्यांचा नीचांक 2926.10 रुपये प्रति शेअर आहे.