टाटा समूहाच्या टाटा टेलीसर्व्हिसेस (महाराष्ट्र) लिमिटेड अर्थात टीटीएमएलमध्ये आज 8 टक्क्यांची उसळी दिसत आहे. आज सुरुवातीच्या व्यवहाराता हा शेअर 8.16 टक्क्यांच्या उसळीसह 68.30 रुपयांवर पोहोचला होता. हा शेअर आज 64.10 रुपयांवर खुला होऊन दिवसाच्या आतापर्यंतच्या उच्चांकावर, अर्थात 68.90 रुपयांवर पोहोचला. महत्वाचे म्हणजे हा शेअर 7.34 रुपयांवरून 291 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. गेल्या २२ वर्षांत या टेलिकॉम सेक्टरच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 815.53 टक्क्यांचा परतावा दिला आहे.
या वर्षभरात आतापर्यंत 42 टक्क्यांहून अधिकचा निगेटिव्ह परतावा दिलेल्या या टाटा समूहाच्या शेअरमध्ये गेल्या 5 दिवसांपासून चढ-उतार दिसून येत आहे. या शेअरने आज चांगली उसळी घेतली आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरने 4 टक्क्यांहून अधिकचा पॉझिटिव्ह परतावा दिला आहे. तसेच, गेल्या 6 महिन्यांत या शेअरने 32 टक्क्यांहून अधिक नुकसान केले आहे. या वर्षात आतापर्यंत तब्बल 25 टक्क्यांचा झटका देणाऱ्या या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 149 रुपये आणि निचांक 49.65 रुपये एवढा आहे.
TTMLने डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत मार्च महिन्यातील तिमाहीत निव्वळ तोट्यात किंचितशी घट नोंदवली आहे. कंपनीला मार्चच्या तिमाहीत 277 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. तर, डिसेंबर तिमाहीच्या तुलनेत रेव्हेन्यूदेखील कमी झाला आहे. मार्च तिमाहीतील कंपनीचा हेव्हेन्यू 280.13 कोटी होता. टीटीएमएल शेअरमध्ये प्रमोटर्सचा वाटा 74.36 टक्के एवढा आहे. तसेच, पब्लिक शेअरहोल्डिंग 25.64 टक्के एवढी आहे.
(टीप येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)