वस्तू आणि सेवा कर (GST) प्राधिकरणाने भारतीय आयुर्विमा निगम (LIC) वर कर कमी भरल्या संदर्भात दंड ठोठावला आहे. विमा कंपनीने बुधवारी ही माहिती दिली. एलआयसीने स्टॉक एक्सचेंजला सांगितले की, त्यांना जम्मू आणि काश्मीरसाठी व्याज आणि दंडासह जीएसटी संकलनासाठी ३६,८४४ रुपयांची मागणी ऑर्डर मिळाली आहे. राज्य कर अधिकारी, श्रीनगर यांच्याकडून ९ ऑक्टोबर २०२३ रोजीच्या सूचनेनुसार, LIC ने काही बिलांवर १८ टक्क्यांऐवजी १२ टक्के GST भरल्याचे समोर आले आहे.
रॉकेट बनला 'या' कंपनीचा शेअर, 1 मिनिटात केली 200 कोटी रुपयांची कमाई
कर प्राधिकरणाने २०१९-२० साठी मागणी आदेश आणि दंडाची सूचना जारी केली आहे. यामध्ये जीएसटी १०,४६२ रुपये, दंड २०,००० रुपये आणि व्याज ६,३८२ रुपये आहे. एलआयसीने सांगितले की, महामंडळाच्या आर्थिक, परिचालन किंवा इतर कामांवर कोणताही परिणाम झालेला नाही. एलआयसीला ऑक्टोबरमध्ये ८४ कोटी रुपये आणि सप्टेंबरमध्ये २९० कोटी रुपयांच्या आयकर दंडाची नोटीस मिळाली होती.
आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी बुधवारी LIC च्या शेअर्समध्ये किंचित वाढ नोंदवण्यात आली. हा शेअर ६४० रुपयांच्या खाली व्यवहार करत होता. ट्रेडिंग दरम्यान स्टॉकमध्ये ०.५०% ची वाढ दिसून आली. मार्केट कॅप ४,०३,५६६.४८ कोटी रुपये आहे.