Lokmat Money >शेअर बाजार > TCS चे गुंतवणूकदार मालामाल, एका आठवड्यात 32000 कोटींची कमाई; Reliance ला झटका

TCS चे गुंतवणूकदार मालामाल, एका आठवड्यात 32000 कोटींची कमाई; Reliance ला झटका

टाटा समूहातील Tata Consultancy Services (TCS) ने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2023 06:45 PM2023-10-08T18:45:07+5:302023-10-08T18:45:51+5:30

टाटा समूहातील Tata Consultancy Services (TCS) ने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये ...

TCS investers Malamal, earns Rs 32,000 crore in one week; A blow to Reliance | TCS चे गुंतवणूकदार मालामाल, एका आठवड्यात 32000 कोटींची कमाई; Reliance ला झटका

TCS चे गुंतवणूकदार मालामाल, एका आठवड्यात 32000 कोटींची कमाई; Reliance ला झटका

टाटा समूहातील Tata Consultancy Services (TCS) ने आपल्या गुंतवणूकदारांना प्रचंड नफा मिळवून दिला आहे. गेल्या एका आठवड्यात कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 30,000 कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली. शेअर बाजारातील टॉप 10 कंपन्यांच्या मार्केट कॅपबद्दल बोलायचे झाल्यास, पाच कंपन्यांचे मूल्य एकूण 86,234.73 कोटी रुपयांनी वाढले आहे. यात टीसीएसला सर्वाधिक फायदा झाला आहे, तर रिलायन्सला सर्वाधिक तोटा सहन करावा लागला आहे.

टीसीएस गुंतवणूकदारांची बंपर कमाई
गेल्या आठवड्यात ज्या पाच सेन्सेक्स कंपन्यांचे बाजार भांडवल वाढले, त्यात TCS, HDFC बँक, Infosys, HUL आणि Bjaj Finance चा समावेश आहे. या कालावधीत, TCS चे बाजार भांडवल (TCS Market Cap) 13,24,649.78 कोटी रुपयांपर्यंत वाढले. कंपनीच्या गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 32,730.22 कोटी रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे टाटा समूहाच्या या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना मोठा फायदा झाला आहे.

या कंपन्यांचाही फायदा 
टीसीएस व्यतिरिक्त ज्या कंपन्यांनी त्यांच्या गुंतवणूकदारांना फायदा दिला आहे, त्यापैकी बजाज फायनान्सने 21,697.96 कोटी रुपयांची कमाई केली आहे. कंपनीचे मार्केट कॅप वाढून 4,94,884.37 कोटी रुपये झाले. तिसरी कमाई करणारी कंपनी IT दिग्गज इन्फोसिस होती. कंपनीचे मार्केट कॅप 18,057.94 कोटी रुपयांनी वाढून 6,13,655.04 कोटी रुपये झाले. तसेच, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडचे ​​बाजार मूल्य 7,730.16 कोटी रुपयांनी वाढून 5,87,104.12 कोटी रुपये झाले, तर HDFC बँकेचे बाजार मूल्य 6,018.45 कोटी रुपयांनी वाढून 11,63,164.31 कोटी रुपये झाले.

रिलायन्सच्या गुंतवणूकदारांचे नुकसान 
गेल्या आठवड्यात ज्या पाच कंपन्यांमध्ये गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे, त्यात मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड आघाडीवर आहे. रिलायन्स एमकॅप एका आठवड्यात 19,336.49 कोटी रुपयांनी घसरून 15,68,216.88 कोटी रुपयांवर आले. यानंतर, सर्वात मोठी घसरण ICICI बँकेच्या मार्केट कॅपमध्ये दिसली. एमकॅप 4,671.54 कोटी रुपयांनी कमी होऊन 6,62,057.43 कोटींवर आला. SBI MCap 4,105.33 कोटी रुपयांनी घसरून 5,30,211.19 कोटी रुपये आणि ITC MCap 2,743.6 कोटी रुपयांनी घसरून 5,51,463.84 कोटी रुपयांवर आले. 

(टीप-शेअर बाजारात कोणतीही गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)

Web Title: TCS investers Malamal, earns Rs 32,000 crore in one week; A blow to Reliance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.