TCS Market Value : गेल्या आठवड्यात शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्स आणि निफ्टी घसरणीसह बंद झाले. गेल्या पाच व्यापार दिवसांत सेन्सेक्सच्या टॉप-10 पैकी सहा कंपन्यांना प्रचंड तोटा सहन करावा लागला आणि एकूण 1.55 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. पण, या काळात चार कंपन्या अशा होत्या, ज्यांनी गुंतवणारांना प्रचंड नफा मिळवून दिला. यात टाटा समूहाची कंपनी टीसीएस आघाडीवर होती.
BSE सेन्सेक्समध्ये मोठी घसरण
गेल्या आठवड्यात BSE बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्स 4813 अंकांनी घसरुन 30 सप्टेंबरच्या 84,200 च्या उच्चांकावरून 8 नोव्हेंबर रोजी 79,486 च्या पातळीवर आला. दरम्यान, मुकेश अंबानींच्या रिलायन्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, एचयूएल आणि एलआयसी या कंपन्यांच्या बाजारमूल्यात मोठी घसरण दिसून आली, तर फायदा झालेल्या चार कंपन्यांपैकी टीसीएस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस आणि एसबीआयचा समावेश आहे.
मुकेश अंबानींच्या कंपनीला मोठा झटका
मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ही कंपनी सर्वाधिक नुकसान झालेल्या कंपन्यांमध्ये होती. रिलायन्स मार्केट कॅप 74,563.37 कोटी रुपयांनी घसरून 17,37,556.68 कोटी रुपयांवर आले. याशिवाय, भारती एअरटेल 26,274.75 कोटी रुपयांनी कमी होऊन 8,94,024.60 कोटी रुपयांवर आले. ICICI बँकेनेही गुंतवणूकदारांचे नुकसान केले आणि बँकेचे मार्केट कॅप रु. 22,254.79 कोटींनी घसरून रु. 8,88,432.06 कोटी झाले. LIC चे मार्के कॅपदेखील 9,930.25 कोटी रुपयांनी घसरून 5,78,579.16 कोटी रुपयांवर आले, तर HUL चे 7,248.49 कोटी रुपयांनी घसरून 5,89,160.01 कोटी रुपयांवर आले.
टीसीएसची बंपर कमाई
TCS मार्केट कॅप वाढून रु. 14,99,697.28 कोटी झाले. अशाप्रकारे गुंतवणूकदारांनी केवळ पाच दिवसांत 57,744.68 रुपये छापले. याशिवाय, आयटी दिग्गज इन्फोसिसचे बाजार मूल्य 28,838.95 कोटी रुपयांनी वाढून 7,60,281.13 कोटी रुपये झाले. SBI देखील आपल्या गुंतवणूकदारांना लाभ देणाऱ्या कंपन्यांच्या यादीत आहे आणि 19,812.65 कोटी रुपयांच्या वाढीसह तिचे मार्केट कॅप 7,52,568.58 कोटी रुपये झाले आहे. HDFC बँक MCap देखील 14,678.09 कोटी रुपयांनी 13,40,754.74 कोटी रुपयांवर पोहोचला.
तोटा होऊनही रिलायन्स पुढे
मुकेश अंबानींची कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे मार्केट कॅप गेल्या आठवड्यात घसरले असेल, परंतु असे असूनही ती देशातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर आहे. बाजार मूल्यानुसार RIL नंतर, TCS, HDFC बँक, भारती एअरटेल, ICICI बँक, Infosys, SBI, ITC, HUL आणि LIC यांची नावे आहेत.
(टीप-शेअर बाजारात कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या मार्केट तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्या.)