TCS Share Buyback: दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आपले काही शेअर्स बायबॅक करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने शुक्रवारी यासंदर्भात एक निवेदन जारी केलं. 'टीसीएसच्या संचालक मंडळाची 11 ऑक्टोबर 2023 रोजी बैठक पार पडणार आहे. यामध्ये शेअर बायबॅकच्या प्रस्तावावर विचार केला जाईल,' असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. बायबॅक योजनेची घोषणा होण्यापूर्वी, शुक्रवारी TCS चे शेअर्स एनएसईवर जवळपास 1 टक्क्यांनी वाढून 3,621.25 रुपयांवर बंद झाले.
टीसीएसच्या संचालक मंडळानं शेअर बायबॅक प्रस्तावावर विचार करण्यासाठी 11 ऑक्टोबर ही तारीख निवडली आहे. त्याच दिवशी, कंपनी चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीचे निकाल देखील प्रसिद्ध करेल. टीसीएसनं यापूर्वी 2022 मध्ये शेअर बायबॅक केले होते आणि त्यावेळी कंपनीनं सुमारे 18,000 कोटी रुपयांचे शेअर्स बायबॅक केले होते. शेअर बायबॅकचा इश्यू साईज 4 कोटी शेअर्सचा होता, ज्याची किंमत 4,500 रुपये प्रति शेअर आणि फेस व्हॅल्यू 1 रुपया प्रति शेअर होती.
दोन कंपन्यांनी केले शेअर बायबॅक
या वर्षी आणखी दोन आयटी कंपन्यांनी शेअर बायबॅक केले आहेत. फेब्रुवारी 2023 मध्ये, इन्फोसिसनं त्यांचे 6.04 कोटी शेअर्स 9,300 कोटी रुपयांना विकत घेतले होते. इन्फोसिसने हे शेअर्स सरासरी 1,543.10 रुपये प्रति शेअर या दराने खरेदी केले, तर याची कमाल बायबॅक किंमत 1,850 रुपये प्रति शेअर होती.
तर दुसरीकडे जूनमध्ये, विप्रो या देशातील चौथ्या क्रमांकाच्या आयटी कंपनीनं 12,000 कोटी रुपयांच्या शेअर बायबॅकची घोषणा केली होती. हे आजवरचे सर्वात मोठे बायबॅक आहे.
TCS ची आणखी एका शेअर बायबॅकची तयारी; बाजार बंद होताच आली मोठी अपडेट
दिग्गज आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आपले काही शेअर्स बायबॅक करण्याच्या तयारीत आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2023 05:35 PM2023-10-06T17:35:41+5:302023-10-06T17:36:38+5:30