Join us  

TCS ची घोषणा; अखेर शेअर बायबॅकची तारीख ठरली, गुंतवणूकदारांना होणार मोठा फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2023 9:56 PM

IT जायंट टाटा कन्सल्‍टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने मंगळवारी शेअर बायबॅकची घोषणा केली.

TCS Share Buyback:टाटा समूहाची टेक कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड (TCS) ने शेअर बायबॅकची तारीख जाहीर केली आहे. मंगळवारी कंपनीने सांगितले की, 17,000 कोटी रुपयांचे शेअर बायबॅक 1 डिसेंबरला सुरू होईल आणि 7 डिसेंबरपर्यंच चालेल. कंपनी 4.09 कोटी रुपयांपर्यंतची इक्विटी 4,150 रुपये प्रति शेअर दराने परत घेईल, ज्याचे एकूण मूल्य 17,000 कोटी रुपये आहे. टाटा कंपनीचे सप्टेंबरचे निकाल आल्यानंतर 11 ऑक्टोबर रोजी बायबॅकचा खुलासा झाला.

बायबॅकसंदर्भात कंपनीने काय सांगितले?एक्सचेंज फाइलिंगमध्ये कंपनीने म्हटले आहे की, शेअर बायबॅकमुळे कंपनीला व्यवसायात कोणताही नफा किंवा कमाई होणार नाही, परंतु गुंतवणूकीचे प्रमाण कमी होईल. कंपनीला हवे असते तर ही रक्कम अन्यत्र गुंतवून पैसे कमावता आले असते. व्यवहार, कर आणि इतर खर्चांसह शेअर बायबॅकचा एकूण खर्च 17,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होणार नाही, असा कंपनीचा विश्वास आहे.

गुंतवणूकदार किती कमावतील?मंगळवारी TCS चे शेअर्स NSE वर 0.47% च्या वाढीसह Rs 3,473.30 वर बंद झाले, तर TCS Rs 4,150 वर शेअर्स बाय बॅक करत आहे. अशा परिस्थितीत कंपनी सध्याच्या किमतीपेक्षा 19.5 टक्के अधिक प्रीमियमने गुंतवणूकदारांकडून शेअर्स खरेदी करेल. याचा अर्थ गुंतवणूकदारांना प्रत्येक शेअरवर 19.5 टक्के अधिक कमाई होईल. कंपनीने शेअर्स खरेदीसाठी 25 नोव्हेंबर ही रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे.

शेअर बायबॅक म्हणजे काय?शेअर बाजाराच्या भाषेत याचा अर्थ शेअर्स परत घेणे, असा होतो. जेव्हा एखादी कंपनी नफ्यात असते, तेव्हा ती गुंतवणूकदारांना फायदा देण्यासाठी शेअर्स बायबॅक करते, म्हणजेच ती गुंतवणूकदारांकडून शेअर्स परत खरेदी करते. कंपनी शेअर्सच्या सध्याच्या किमतीपेक्षा जास्त पैसे देऊन गुंतवणूकदारांकडून शेअर्स परत घेते, ज्यामुळे गुंतवणूकदारांना फायदा होतो. 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारटाटागुंतवणूकव्यवसाय