टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंगच्या (Texmaco Rail and Engineering) शेअर्समध्ये सोमवारी जबरदस्त तेजी दिसून आली. कंपनीच्या शेअरने 52 आठवड्यांचा नवा उच्चांक गाठला आहे. कंपनीचा शेअर 12 टक्क्यांहून अधिकने वाढून 149.40 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीचा शेअर शुक्रवारी 131.05 रुपयांवर बंद झाला होता. कंपनीचा 52 आठवड्यांतील निचांक 40.49 रुपये एवढा आहे.
2 वर्षांत दिला 390 टक्क्यांचा परतावा - टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंगचा शेअरमध्ये 2 वर्षांत 390 टक्क्यांची वाढ झाली आहे. कंपनीचा शेअर 27 ऑगस्ट 2021 रोजी बीएसईवर 29.87 रुपयांवर होता. तो 28 ऑगस्त 2023 रोजी बीएसईवर 149.40 रुपयांवर पोहोचला आहे. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 2 वर्षांपूर्वी कंपनीच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती, तर आता त्याचे 5 लाख रुपये झाले असते.
6 महिन्यंत दिला 235 टक्क्यांचा परतावा - टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंगचा शअर गहेल्या 6 महिन्यांत 235 टक्क्यांनी वधारला आहे. कंपनीचा शेअर 28 फेब्रुवारी 2023 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेन्जवर 44.20 रुपयांवर होता. कंपनीचा शेअर 28 ऑगस्ट 2023 रोजी बीएसईवर 149.40 रुपयांवर पोहोचला. गेल्या एका महिन्यात टेक्समॅको रेल अँड इंजिनिअरिंगच्या शेअरने 43 टक्क्यांची उसळी घेतली आहे. गेल्या 5 दिवसांत कंपनीचा शेअर 24 टक्क्यांनी वधारला आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)