Join us

Swiggy IPO Listing Date : Swiggy IPO चं अलॉटमेंट स्टेटस झालं जाहीर, ग्रे मार्केटमध्ये काय संकेत? उद्या लिस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 3:04 PM

Swiggy IPO Allotment and Listing Date : देशातील बहुप्रतीक्षित फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या आयपीओचं अलॉटमेंट स्टेटस जाहीर झालं आहे. उद्या म्हणजेच १३ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर्सचं लिस्टिंग होणार असल्याची माहिती कंपनीनं एक्स्चेंजला दिली.

Swiggy IPO Allotment and Listing Date : देशातील बहुप्रतीक्षित फूड डिलिव्हरी कंपनी स्विगीच्या आयपीओचं अलॉटमेंट स्टेटस जाहीर झालं आहे. उद्या म्हणजेच १३ नोव्हेंबर २०२४ रोजी शेअर्सचं लिस्टिंग होणार असल्याची माहिती कंपनीनं एक्स्चेंजला दिली. मात्र, त्याच्या लिस्टिंगबाबत साशंकता आहे. यापूर्वी लिस्ट वाहन क्षेत्रातील सर्वात मोठा आयपीओ ह्युंदाई इंडिया लिमिटेडप्रमाणेच तोही लिस्टेड होण्याची शक्यता आहे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. 

देशातील दुसऱ्या क्रमांकाची ई-कॉमर्स आणि फूड डिलिव्हरी कंपनी असूनही त्याला गुंतवणूकदारांचा अल्प प्रतिसाद मिळाला आहे. बहुतांश इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सनं या आयपीओमध्ये रस दाखवला आहे.

किती मिळालेलं सबस्क्रिप्शन?

११३२७ कोटी रुपयांचा आयपीओ बुधवारी, ६ नोव्हेंबर रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला होता, तर सब्सक्रिप्शन ८ नोव्हेंबर रोजी बंद झालं. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सब्सक्रिप्शनच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच ८ नोव्हेंबरपर्यंत आयपीओ ३.५९ पट सब्सक्राइब झाला होता. क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा ६.०२ पट, तर किरकोळ वैयक्तिक गुंतवणूकदारांचा हिस्सा १.१४ पट सब्सक्राइब झाला होता. तर दुसरीकडे एकूण सबस्क्रिप्शनचा ४१ टक्के हिस्सा नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स श्रेणीत आणि १.६५ टक्के हिस्सा कर्मचाऱ्यांच्या श्रेणीत सबस्क्राईब झाला.

जीएमपी काय?

शेअर बाजारात लिस्टिंग होण्याआधी स्विगीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये १ रुपयांच्या जीएमपीवर ट्रेड करत आहेत, जे आयपीओ इश्यू प्राइसच्या केवळ ०.२६ टक्के प्रीमियम आहे. स्विगी आयपीओची इश्यू प्राइस ३९० रुपये होती.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :स्विगीइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार