Join us  

गुंतवणूकदार मालामाल! 294 रुपयांवरून थेट 3000 वर पोहोचला स्टॉक, 3 वर्षांत दिला छप्परफाड परतावा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2023 2:11 PM

गेल्या 3 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 294 रुपयांच्या पातळीवर होती. आज हा शेअर 2,931.10 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक चांगली बातमी आहे. जर आपणही एखाद्या क्षेत्रात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल, तर आज आम्ही आपल्याला पॉवर सेक्टरमधील एका अशा स्टॉकसंदर्भात माहिती देत आहोत, ज्या स्टकने आपल्या गुंतवणूकदारांना 929% चा बम्पर परतावा दिला आहे. या शेअरचे नाव आहे अपार इंडस्ट्रीज लिमिटेड  (Apar Industries Limited). गेल्या 3 वर्षांपूर्वी या शेअरची किंमत 294 रुपयांच्या पातळीवर होती. आज हा शेअर 2,931.10 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

YTD कालावधीत किती वाढला शेअर -  महत्वाचे म्हणजे, YTD कालावधीत या शेअरच्या किमतीत 60.68 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. 2 जानेवारी रोजी कंपनीचा शेअर 1824 रुपयांच्या पातळीवर होता. गेल्या 4 महिन्यांत कंपनीच्या शेअरमध्ये 1,106.90 रुपयांची वाढ झाली असून आज शुक्रवारी हा शेअर 2,931.10 रुपयांच्या पातळीवर व्यवहार करत आहे.

एकावर्षात 2,277.85 रुपयांनी वाढला स्टॉक - गेल्या एका वर्षात हा शेअर 348.69 टक्क्यांनी वाढला आहे. 5 मे 2022 रोजी कंपनीचा शेअर 653 रुपयांच्या पातळीवर होता आणि गेल्या एका वर्षात शेअरच्या किमतीत 2,277.85 रुपयांची वाढ दिसून आली.

3 वर्षांत 1 लाखाचे झाले 10 लाख - गेल्या 3 वूर्षांत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 929 टक्के एवढा बम्पर परतावा दिला आहे. 4 मे 2020 रोजी या कंपनीचा शेअर 294 रुपयांच्या पातळीवर होता. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 3 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तीर, याचे आता 10.29 लाख रुपये झाले असते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक