Lokmat Money >शेअर बाजार > घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती

घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती

स्पाईसजेटने शारजाहस्थित हवाई वाहतूक कंपनी स्काय वन आणि आफ्रिकास्थित कंपनी सफ्रिक इन्व्हेस्टमेंट्सला सोबत घेऊन गो फर्स्ट खरेदी करण्याची योजना आखली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 20, 2023 06:40 AM2023-12-20T06:40:33+5:302023-12-20T06:41:04+5:30

स्पाईसजेटने शारजाहस्थित हवाई वाहतूक कंपनी स्काय वन आणि आफ्रिकास्थित कंपनी सफ्रिक इन्व्हेस्टमेंट्सला सोबत घेऊन गो फर्स्ट खरेदी करण्याची योजना आखली आहे.

The buyer and the seller are both in the loss! SpiceJet is eager to go first, informed the stock market | घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती

घेणारा, विकणारा दाेघेही ताेट्यातच! ‘गो फर्स्ट’साठी स्पाइसजेट उत्सुक, शेअर बाजाराला दिली माहिती

नवी दिल्ली : दिवाळखोरीत निघालेली हवाई वाहतूक कंपनी गो फर्स्टचे अधिग्रहण करण्याची इच्छा स्पाईसजेट एअरलाईनने दर्शविली आहे. शेअर बाजारातील नियामकीय दस्तावेज स्पाईसजेटने ही माहिती दिली आहे. वास्तविक स्वत: स्पाईसजेटीही आर्थिक संकटाचा सामना करीत आहे. गो फर्स्टचे अधिग्रहण करून एक मजबूत आणि व्यावहारिक एयरलाइन बनविण्याचा आपला  इरादा आहे, असे कंपनीने म्हटले आहे.

याआधी आलेल्या वृत्तानुसार, स्पाईसजेटने शारजाहस्थित हवाई वाहतूक कंपनी स्काय वन आणि आफ्रिकास्थित कंपनी सफ्रिक इन्व्हेस्टमेंट्सला सोबत घेऊन गो फर्स्ट खरेदी करण्याची योजना आखली आहे. कंपनीने म्हटले की, आपली वित्तीय स्थिती मजबूत करणे तसेच विकास योजनांत गुंतवणूक करणे यासाठी कंपनीच्या संचालक मंडळाने २७० दशलक्ष डॉलरचे भांडवल उभे करण्याच्या प्रक्रियेस मंजुरी दिली आहे.

स्पाईसजेटही तोट्यात
कंपनीला सप्टेंबर तिमाहीत ४२८ कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. आदल्या वर्षीच्या ८३५ कोटी रुपये तोट्याच्या तुलनेत हा तोटा अर्धा आहे.  

गो फर्स्टवर ६,२०० रुपयांचे कर्ज 
गो फर्स्टच्या विरुद्ध नादारी व दिवाळखोरी प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेचे व्यवस्थापन करणारे ‘रिझोल्यूशन प्रोफेशनल’ (आरपी) शैलेंद्र अजमेरा यांना मागील १० दिवसांत स्पाईसजेटकडून तपासणीची विनंती मिळाली होती. गो फर्स्टवर ६,२०० रुपयांचे कर्ज थकले आहे.

Web Title: The buyer and the seller are both in the loss! SpiceJet is eager to go first, informed the stock market

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.