Join us  

कंपनीनं केली ₹525.36 कोटींची डील, शेअर खरेदीसाठी उडाली गुंतवणूकदारांची झुंबड; केवळ ₹73 आहे किंमत!

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2024 10:00 PM

महत्वाचे म्हणजे, बीएसईवर या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 79 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 13.10 रुपये एवढा आहे.

पटेल इंजिनिअरिंग कंपनी लिमिटेडच्या (PEL) शेअरमध्ये बुधवारी 2% हून अधिकची वृद्धी दिसून आली. कंपनीचा शेअर 73.43 रुपयांच्या इंट्राडे उच्चांकावर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरच्या या वाढीमागचे मुख्य कारण म्हणजे, एक मोठी ऑर्डर. खरे तर, कंपनीला तेलंगणातील ₹525.36 कोटीच्या प्रकल्पासाठी तिच्या संयुक्त उपक्रम (JV) भागीदारासह सर्वात कमी बोली लावणारे म्हणून घोषित करण्यात आले आहे.

काय म्हणते कंपनी? -सिव्हिल इंजिनिअरिंग कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, तेलंगाना सरकारच्या सिंचन आणि सीएडी विभागाने अपल्या जेव्ही पार्टनरसह पटेल इंजिनिअरिंग लिमिटेडला ₹525.36 कोटींच्या प्रकल्पासाठी सर्वात कमी बोली लावणारे म्हणून घोषित केले आहे.

कंपनीने स्टॉक एक्सचेन्जला दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, प्रोजेक्ट कॉन्ट्रॅक्ट मिळण्याच्या तारखेपासून 24 महिन्यांच्या आत पूरर्ण होईल. महत्वाचे म्हणजे कंपनीच्या या घोषणेनंतर बीएसईवर पटेल इंजिनिअरिंगच्या शेअरमध्ये 2.62% ची वाढ झाली आहे. आता हा शेअर इंट्राडेची उच्चांकावर अर्थात ₹73.43 वर पोहोचला  होता. संयुक्त उपक्रम युनिटमध्ये पटेल इंजिनिअरिंगची हिस्सेदारी 51% एवढी आहे.

महत्वाचे म्हणजे, बीएसईवर या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांक 79 रुपये तर 52 आठवड्यांचा नीचांक 13.10 रुपये एवढा आहे. कंपनीचे मार्केट कॅप 5,477.98 कोटी रुपये एवढे आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक