Join us  

रेल्वेकडून मिळालं कंत्राट, शेअरनं पकडला तुफान स्पीड; तुम्हीदेखील करू शकता कमाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 12:17 PM

MIC Electronics Multibagger Smallcap : एलईडी डिस्प्ले व्यवसायातील दिग्गज एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सचे शेअर्स यावर्षी ३१ मार्च रोजी ₹१२ च्या नीचांकी पातळीवर होते.

MIC Electronics Multibagger Smallcap : शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळवून दिला आहे. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मोठं नुकसानही केलंय. त्यामुळे योग्य अभ्यास करूनच नेहमी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. दरम्यान, आता स्मॉल कॅप कंपनी MIC इलेक्ट्रॉनिक्सला पश्चिम मध्य रेल्वेकडून ₹५ कोटी रुपयांची ऑर्डर मिळाली आहे.

अमृत भारत स्टेशन योजनेंतर्गत १५ स्थानकांवर प्रवाशांच्या सुविधेसाठी सामानाचा पुरवठा, इन्स्टॉलेशन, टेस्टिंग आणि उपकरणं बसवण्यासाठी जबलपूर रेल्वे विभागाकडून कंत्राट मिळाल्याची माहिती एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सनं शेअर बाजाराला दिली आहे. हे ऑर्डर कंपनीला पुढील ९ महिन्यांत पूर्ण करायची आहे.

एमआयसी इलेक्ट्रॉनिक्स एलईडी व्हिडिओ डिस्प्ले, इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार उपकरणं आणि दूरसंचार सॉफ्टवेअरमध्ये जागतिक आघाडीवर आहे. कंपनीला LED डिस्प्लेच्या डिझाइन आणि विकास, तसंच निर्मितीमध्ये चांगला अनुभव आहे.

कोणत्या कंपन्या आहेत ग्राहक?एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सच्या ग्राहकांच्या यादीमध्ये लार्सन अँड टुब्रो लिमिटेड, भारतीय रेल्वे, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, एचपी, एसबीआय, लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन, रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा टेलिसर्व्हिसेस, हैदराबाद रेसकोर्स, कोल इंडिया लिमिटेड, गुजरात सायन्स सिटी इत्यादींचा समावेश आहे.

३ वर्षात उत्तम नफागेल्या ३ वर्षांत, एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सने आपल्या गुंतवणूकदारांना १६० टक्के परतावा दिला आहे. गेल्या ६ महिन्यांत एमआयसी इलेक्ट्रॉनिक्सच्या शेअर्समध्ये ७० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा