Join us

₹8500 वरून थेट ₹430 वर आला शेअर; आता कंपनीनं मोठी डील केली, खरेदीसाठी लोकांची झुंबड उडाली!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 06, 2023 6:26 PM

हा शेअर ट्रेडिंग दरम्यान 5 टक्क्यांच्या तेजीसह 430.35 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच, शेअरची क्लोजिंग किंमत 427.75 रुपये एवढी होती.

शेअर बाजारात आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी अर्थात बुधवारी ईकेआय एनर्जीच्या (EKI energy share price) शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसून आली आहे. हा शेअर ट्रेडिंग दरम्यान 5 टक्क्यांच्या तेजीसह 430.35 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तसेच, शेअरची क्लोजिंग किंमत 427.75 रुपये एवढी होती. 

EKI एनर्जीच्या आयपीओची इश्यू प्राइस ₹100 ते ₹102 प्रति इक्विटी शेअर एवढी होती. या इश्यूसाठी एका लॉटमध्ये 1200 शेअर होते. अशात एका गुंतवणूकदाराला या आयपीओमध्ये ₹1,22,400 ची गुंतवणूक करावी लागली. हा शेअर वर्ष 2022 मध्ये 8,500 रुपयांच्य वर पोहोचला होता. तेव्हा कंपनीने बोनस शेअरची घोषणा केली होती. 

इंडियन ऑईलसोबत कंपनीची डील -ग्लोबल कार्बन क्रेडिट डेव्हलपर आणि पुरवठादार EKI एनर्जी सर्व्हिसेसने शाश्वत 'इनडोअर' सोलर कुकिंग सिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी सार्वजनिक क्षेत्रातील रिफायनर इंडियन ऑइल कॉर्पोरेशनसोबत भागीदारी केली आहे. EKI एनर्जी सर्व्हिसेस आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने या संदर्भात एक औपचारिक सामंजस्य करार (MoU) केला आहे.

या भागीदारीचा उद्देश,इंडियन ऑईलच्या अभिनव 'इनडोर' सोलर कुकिंग सिस्टिम 'सूर्य नूतन'ला प्रोत्साहन देणे असा आहे. यासंदर्भात बोलताना EKI एनर्जीचे व्यवस्थापकीय संचालक आणि अध्यक्ष मनीष डबकारा म्हणाले, 'सूर्य नूतन'ला प्रोत्साहन देऊन आम्ही केवळ नावीन्यपूर्ण गोष्टींना समर्थनच देत नाही, तर देशाच्या पर्यावरणात्मक दृष्टीने शाश्वत विकासाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जबाबदारीही पार पाडत आहोत.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक