Lokmat Money >शेअर बाजार > निकालाने उत्साह, पण युद्धाचे टेंशन; खनिज तेलाचे दर, विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या खरेदीकडे लक्ष

निकालाने उत्साह, पण युद्धाचे टेंशन; खनिज तेलाचे दर, विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या खरेदीकडे लक्ष

अनेक सप्ताहांनंतर गतसप्ताहात बाजाराने वाढ दाखविल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीसा उत्साह आहे.

By प्रसाद गो.जोशी | Published: November 25, 2024 11:38 AM2024-11-25T11:38:19+5:302024-11-25T11:38:19+5:30

अनेक सप्ताहांनंतर गतसप्ताहात बाजाराने वाढ दाखविल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीसा उत्साह आहे.

The excitement of the maharashtra election result but the tension of war Prices of mineral oil, focus on purchases of foreign investment institutions | निकालाने उत्साह, पण युद्धाचे टेंशन; खनिज तेलाचे दर, विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या खरेदीकडे लक्ष

निकालाने उत्साह, पण युद्धाचे टेंशन; खनिज तेलाचे दर, विदेशी गुंतवणूकदार संस्थांच्या खरेदीकडे लक्ष

अनेक सप्ताहांनंतर गतसप्ताहात बाजाराने वाढ दाखविल्याने गुंतवणूकदारांमध्ये काहीसा उत्साह आहे. मात्र रशिया-युक्रेन दरम्यानचा वाढता तणाव आणि खनिज तेलाचे वाढते दर हे बाजाराची वाढ रोखणार का? याकडेच बाजाराचे लक्ष लागले आहे. गेल्या दीड महिन्यापासून सातत्याने बाजारातून पैसा काढणाऱ्या परकीय वित्तसंस्था खरेदीसाठी केव्हा येतील, त्यावर बाजाराची वाटचाल अवलंबून आहे. 

शनिवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभांचे निकाल लागले आहेत. महाराष्ट्रामध्ये महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यामुळे बाजारात तेजी येण्याची शक्यता आहे. मात्र परकीय वित्तसंस्थांची विक्री, युद्धाची भीती आणि खनिज तेलाच्या दरामध्ये होत असलेल्या वाढीमुळे महागाई वाढण्याचा धोका यामुळे बाजारावर विक्रीचे सावट कायम आहे. अमेरिकेमधील बॉण्ड्सवरील व्याजदर चांगला असल्याने अस्थिर वातावरणामध्ये परकीय वित्तसंस्था त्यामध्ये गुंतवणूक करीत असल्यामुळे परकीय वित्तसंस्थांची भारतामधील विक्री केव्हा थांबेल याबाबत अनिश्चितता आहे.

वित्तसंस्थांनी काढले २६ हजार ५०० कोटी 

  • ऑक्टोबरच्या प्रारंभापासून बाजारामध्ये विक्री करीत असलेल्या परकीय वित्तसंस्थांनी विक्री कायम राखली आहे. 
  • नोव्हेंबरच्या २२ तारखेपर्यंत या संस्थांनी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणावर विक्री करून २६,५३३ कोटी रुपये काढून घेतले आहेत.
  • बाजारावर कायम विक्रीचा दबाव राहत असल्याने बाजारही खाली जात होता. 
  • गतसप्ताहामध्ये बाजार वाढल्यामुळे गुंतवणूकदारांच्या मालमत्तेमध्ये वाढ झाल्याचे दिसते.

Web Title: The excitement of the maharashtra election result but the tension of war Prices of mineral oil, focus on purchases of foreign investment institutions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.