Share Market Closing: बुधवार 5 जुलै रोजी शेअर बाजारात नवा विक्रम पाहायला मिळाला. मुंबई शेअर बाजारातील लिस्टेड कंपन्यांचे बाजार भांडवल बुधवारी प्रथमच 300 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले. त्यामुळे शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्तीत बुधवारी सुमारे 49,000 कोटी रुपयांची वाढ झाली. दरम्यान, गेल्या 5 दिवसांपासून सुरू असलेला बीएसईचा बेंचमार्क निर्देशांक सेन्सेक्समधील तेजी थांबली आणि बाजार 33 अंशांच्या किंचित घसरणीसह बंद झाला. परंतु ब्रॉडर मार्केटमध्ये तेजी कायम राहिली. त्यामुळे बाजार भांडवलात वाढ झाली. एफएमसीजी, ऑटोमोबाईल, ऑईल आणि गॅस कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली. दुसरीकडे, बँकिंग आणि वित्तीय कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरणीचा कल दिसून आला.
कामकाजाच्या अखेरच्या सत्रात मुंबई शेअर बाजारावरील (BSE) 30 शेअर्सचा निर्देशांक सेन्सेक्स 33.01 अंक किंवा 0.050 टक्क्यांनी घसरून 65,446.04 वर बंद झाला. दुसरीकडे, नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा (NSE) 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 9.50 अंक किंवा 0.05 टक्क्यांच्या वाढीसह 19,398.50 च्या पातळीवर बंद झाला.
गुंतवणूकदारांनी 49 हजार कोटी कमावले
BSE वर सूचीबद्ध झालेल्या कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल 5 जुलै रोजी 300.06 लाख कोटी रुपयांवर पोहोचलं. मंगळवारी म्हणजेच 4 जुलै रोजी ट्रेडिंग दरम्यान ते 298.57 लाख कोटी रुपये होते. अशाप्रकारे, बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांचे मार्केट कॅप सुमारे 49 हजार कोटी रुपयांनी वाढले आहे. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 49 हजार कोटी रुपयांची वाढ झाली.