Share Market News: भारतीय शेअर बाजारानं पहिल्यांदाच हाँगकाँगला मागे टाकलं आहे. ब्लूमबर्ग डेटानुसार, सोमवारी भारतीय एक्सचेंजेसवर लिस्टेड स्टॉकचे एकत्रित मूल्य ४.३३ ट्रिलियन डॉलर्सवर पोहोचलं. तर, हाँगकाँगच्या शेअर बाजारावरील लिस्टेड शेअर्सचं एकत्रित मूल्य ४.२९ ट्रिलियन डॉलर्स होतं. यासह भारत जगातील चौथ्या क्रमांकाचे इक्विटी मार्केट बनला आहे.
५ डिसेंबर रोजी देशांतर्गत बाजाराचं मार्केट कॅप प्रथमच ४ ट्रिलियन डॉलर्सच्या पुढे गेलं. यापैकी सुमारे २ ट्रिलियन डॉलर्स गेल्या चार वर्षांत आले. वेगानी वाढणाऱ्या किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येचा आधार आणि मजबूत कॉर्पोरेट कमाई यामुळे भारतात इक्विटी वेगानं वाढत आहे. जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या देशानं चीनला पर्याय म्हणून स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. भारतीय बाजारपेठ आता जागतिक गुंतवणूकदार आणि कंपन्यांकडून नवं भांडवल आकर्षित करत आहे.
इथपर्यंत पोहोचण्याचं कारण काय?
“भारतात विकासाला तेजीनं चालना देण्यासाठी सर्व गोष्टी उपस्थित आहेत,” असं मुंबईतील अॅक्सिस म्युच्युअल फंडाचे मुख्य गुंतवणूक अधिकारी आशिष गुप्ता म्हणाले. भारतीय शेअर्समध्ये सातत्यानं होणारी वाढ आणि हाँगकाँगमधील ऐतिहासिक घसरण भारताला या टप्प्यावर घेऊन गेली आहे.
भारत बनणार जगाचं विकासाचं इंजिन
चीनचे कठोर कोविड-१९ निर्बंध, कॉर्पोरेशनवरील नियामक कारवाई, मालमत्ता क्षेत्रातील संकट आणि पाश्चिमात्य देशांसोबतचा भू-राजकीय तणाव यामुळे जगाच्या वाढीचे इंजिन म्हणून चीनच्या आशा धुळीस मिळाल्या आहेत. चिनी आणि हाँगकाँगच्या शेअर्सचं एकूण बाजार मूल्य २०२१ मध्ये त्यांच्या सर्वोच्च शिखरापासून ६ ट्रिलियन डॉलर्स पेक्षा जास्त घसरले आहे.
हाँगकाँगमध्ये कोणतीही नवं लिस्टिंग होत नाही. आयपीओ हबसाठी जगातील सर्वात व्यस्त ठिकाणांपैकी एक म्हणून ते आपले स्थान गमावत आहे. दरम्यान, काही रणनीतीकार बदलांसाठी आशावादी आहेत. नोव्हेंबरच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये चिनी शेअर्स भारतीय स्पर्धकांच्या तुलनेत उत्तम कामगिरी करतीश असा विश्वास युबीएस ग्रुप एजीनं व्यक्त केलाय.
Share Market : भारतीय स्टॉक मार्केटनं हाँगकाँगला टाकलं मागे, बनला जगातील चौथ्या क्रमांकाचा शेअर बाजार
भारतीय शेअर बाजारानं पहिल्यांदाच हाँगकाँगला मागे टाकलं आहे.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2024 09:19 AM2024-01-23T09:19:15+5:302024-01-23T09:19:51+5:30