Join us

₹१००० च्या पुढे लिस्ट झाला हा IPO, पहिल्याच दिवशी गुंतवणूकदार मालामाल; ८२ पट झालेला सबस्क्राईब

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 12:15 PM

हॅपी फोर्जिंग्स लिमिटेडचे ​​शेअर्स आज 27 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले.

Happy Forgings IPO Listing today: हॅपी फोर्जिंग्स लिमिटेडचे ​​शेअर्स आज 27 डिसेंबर रोजी शेअर बाजारात लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स बीएसई वर 1001.25 रुपयांवर 18 टक्के प्रीमियमसह लिस्ट झाले. त्याच वेळी, हा शेअर एनएसईवर 1,000 रुपयांवर 17 टक्क्यांच्या प्रीमियमसह लिस्ट झाला. याचा प्राईज बँड 850 रुपये निश्चित करण्यात आला होता.

कंपनीचा आयपीओ 19 डिसेंबर ते 21 डिसेंबर दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. तीन दिवसांच्या या प्रक्रियेदरम्यान हा आयपीओ एकूण 82.04 पट सबस्क्राईब झाला होता. किरकोळ गुंतवणूकदारांची श्रेणी 15.09 पट सबस्क्राईब झाली, तर हाय नेटवर्थ इंडिविज्युअल कोटा 62.17 पट सबस्क्राईब झाला. तर क्वालिफाईड इंन्स्टिट्युशनल्स बायर्सचा कोटा आरक्षित हिस्स्याच्या 220.48 पट सबस्क्राईब झाला होता.

हॅपी फोर्जिंग्स आयपीओमधून जमा झालेला निधी कर्जाची परतफेड करण्यासाठी वापरेल. उर्वरित निधी त्याच्या सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरला जाईल. जेएम फायनान्शिअल्स (JM Financial), अॅक्सिस कॅपिटल (Axis Capital), एन्क्वायरस कॅपिटल (Equirus Capital) आणि मोतीलाल ओस्वाल इन्व्हेस्टमेंट अॅडव्हायझर्स (Motilal Oswal Investment Advisors) हे इश्यूचे मर्चंट बँकर होते, तर लिंक इनटाईम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (Link Intime India Pvt Ltd) हे रजिस्ट्रार होते.

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजारगुंतवणूक