Plada Infotech IPO : प्लाडा इन्फोटेकनं शेअर बाजारात आज जबरदस्त एन्ट्री घेतली आहे. कंपनीचे शेअर्स एनएसई एसएमईवर (NSE SME) 22.9 टक्के प्रीमियमसह ५९ रुपयांवर लिस्ट झाले. त्यामुळे या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना पहिल्याच दिवशी प्रचंड नफा मिळाला आहे. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांक ६० रुपये प्रति शेअर आहे. प्लाडा इन्फोटेकच्या आयपीओचा प्राईज बँड ४८ रुपये प्रति शेअर होता.जबरदस्त लिस्टिंगनंतर प्लाडा इन्फोटेकच्या (Plada Infotech Listing) शेअर्समध्ये नफा वसूली दिसून आली. कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं. यामुळे प्लाडा इन्फोटेकचे शेअर्स ५६.०५ रुपयांवर आले.४ दिवसांत ८० पट सबस्क्रिप्शनप्लाडा इन्फोटेकचा आयपीओ २९ सप्टेंबर रोजी खुला झाला होता. गुंतवणूकदारांकडे हा आयपीओ सबस्क्राईब करण्यासाठई ४ ऑक्टोबर २०२३ पर्यंतची वेळ होती. या ४ दिवसांत हा आयपीओ ८० पटींपेक्षा अधिक सबस्क्राईब झाला होता. प्लाडा इन्फोटेकच्या आयपीओची लॉट साईज ३ हजार शेअर्सची होती. यामुळे गुंतवणूकदारांना एका लॉटसाठी किमान १,४४,००० रुपयांची गुंतवणूक करावी लागली असती. प्लाडा इन्फोटेकच्या आयपीओची साईज १२.३६ कोटी रुपये होती. कंपनीनं आयपीओद्वारे २५.७४ लाख शेअर्स फ्रेश इश्यूद्वारे जारी केले आहेत.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)