Mukka Proteins IPO: मुक्का प्रोटीन्स लिमिटेड च्या IPO नं आज 7 मार्च रोजी शेअर बाजारात जबरदस्त एन्ट्री केली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईवर 28 रुपयांच्या प्राइस बँडच्या तुलनेत 44 रुपयांवर लिस्ट झाले. कंपनीचे शेअर्स 57.14 टक्क्यांच्या प्रीमिअमवर लिस्ट झाले. याशिवाय, हा शेअर NSE वर 42.8 च्या प्रीमियमसह 40 रुपयांवर लिस्ट झाला. मुक्का प्रोटीन्सचा आयपीओ 29 फेब्रुवारी ते 4 मार्च दरम्यान सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. कंपनीच्या आयपीओची एकूण साईज 224 कोटी रुपये आहे. मुक्का प्रोटीन्स आयपीओची किंमत 26 ते 28 रुपये होती.
गुंतवणूकदारांकडून उत्तम प्रतिसाद
224 कोटी रुपयांचा आयपीओ तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी 136.99 पट सबस्क्राइब झाला. नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स श्रेणीत 250.38 पट, इनस्टिट्युशनल इनव्हेस्टर्स श्रेणीत 189.28 पट आणि रिटेल इनव्हेस श्रेणीत आयपीओ 58.52 पट सबस्क्राइब झाला. हा IPO पूर्णपणे 8 कोटी इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यू होता.
कंपनीच्या बाबतीत
मुक्का प्रोटीन्स लिमिटेड फिश मील, फिश ऑइल आणि फिश विरघळणारी पेस्ट एक्वा फीड (मासे आणि कोळंबीसाठी), पोल्ट्री फीड (ग्रिल आणि लेयरसाठी) आणि पाळीव प्राण्यांच्या अन्न उत्पादनातील आवश्यक घटक आहेत. (टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)