शेअर बाजारात ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडचा शेअर गुरुवारी 5 टक्क्यांनी वधारून 330.60 रुपयांवर पोहोचला आहे. शेअर्सच्या या वाढीमागील एक महत्वाचे कारण आहे. ज्युपिटर वॅगन्स लिमिटेडने गुरुवारी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना रेल्वे मंत्रालयाकडून 1,617 कोटी रुपयांचे मोठे कंत्राट मिळाले आहे. हे कंत्राट चार हजार वॅगनच्या पुरवठ्यासाठी मिळाले आहे.
काय म्हणते कंपनी? -ज्युपिटर वॅगन्सने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, "रेल मंत्रालयाने (रेल्वे बोर्ड) कंपनीला, 4,000 बीओएक्सएनएस वॅगनच्या मॅन्युफॅक्चरिंग आणि पुरवठ्यासाठी 1,617 कोटी रुपयांचे कंत्राट दिले आहे.'' ज्युपिटर समूह रेल्वे वॅगन, प्रवासी डिब्ब्यांसाठीचे घटक, रोलिंग स्टॅक आणि ट्रॅकसाठी मिश्र धातु स्टील कास्टिंग बनवते.
सहा महिन्यात 126% ची वृद्धी -हा शेअर गेल्या सहा महिन्यांत 146 रुपयांवरून सध्याच्या 330.60 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. या कालावधीत या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना 126 टक्क्यांपर्यंतचा परतावा दिला आहे. तसेच या वर्षात YTD मध्ये हा शेअर 243.12 टक्क्यांनी वधारून 96 रुपयांवरून सध्याच्या 330.60 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. वर्षभरात या शेअरची किंमत 272.93 टक्क्यांनी वधारली आहे.
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)