Lokmat Money >शेअर बाजार > १३ कंपन्यांच्या २३ कोटी शेअर्सचा लॉक इन पीरिअड ऑक्टोबरला संपणार, पाहा कोणते शेअर्स आहेत यादीत

१३ कंपन्यांच्या २३ कोटी शेअर्सचा लॉक इन पीरिअड ऑक्टोबरला संपणार, पाहा कोणते शेअर्स आहेत यादीत

शेअर बाजारात लिस्ट असलेल्या १३ कंपन्यांच्या शेअर्स आता पुन्हा लवकरच ट्रेडिंग सुरू करता येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2023 02:11 PM2023-10-02T14:11:24+5:302023-10-02T14:11:40+5:30

शेअर बाजारात लिस्ट असलेल्या १३ कंपन्यांच्या शेअर्स आता पुन्हा लवकरच ट्रेडिंग सुरू करता येणार आहे.

The lock in period of 23 crore shares of 13 companies will end on October see which shares are in the list details | १३ कंपन्यांच्या २३ कोटी शेअर्सचा लॉक इन पीरिअड ऑक्टोबरला संपणार, पाहा कोणते शेअर्स आहेत यादीत

१३ कंपन्यांच्या २३ कोटी शेअर्सचा लॉक इन पीरिअड ऑक्टोबरला संपणार, पाहा कोणते शेअर्स आहेत यादीत

शेअर बाजारात लिस्ट असलेल्या १३ कंपन्यांच्या शेअर्स आता पुन्हा लवकरच ट्रेडिंग सुरू करता येणार आहे. या कंपन्यांचा लॉक इन पीरिअड ऑक्टोबरमध्ये संपणार आहे. कोणत्याही कंपनीच्या शेअर्समध्ये असलेल्या लॉक इन पीरिअडचा अर्थ ना त्या शेअर्सचं ट्रेडिंग शकतं ना विक्री. या कालावधीचा उद्देश शेअरधारकांकडून शेअर्समधील पैसा काढण्यापूर्वी कंपनीला स्थिर होऊ देणं आणि आपल्याला स्थापित करण्याची वेळ देणं हा आहे. लॉक इन पीरिअड संपण्याचा अर्थ हे शेअर केवळ ट्रेडिंगसाठी पात्र होतील, पण बाजारात त्याची शेअर्स मात्र विकता येणार नाहीत.

ज्या 13कंपन्यांबद्दल बोलले जात आहे, त्यापैकी अलीकडेच लिस्ट झालेल्या इंडियाफोर्ज लिमिटेडपासून माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिडेट आणि एंजेल वन लिमिटेड सारख्या जुन्या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांचे २३ कोटी शेअर्स ऑक्टोबरमध्ये ट्रेडिंगसाठी पात्र ठरतील. नुवामा अल्टरनेटिव्ह अँड क्वांटिटेटिव्ह रिसर्चच्या रिपोर्टनुसार २०२३ मध्ये ३७ कंपन्यांच्या २२७ कोटी शेअर्सचा लॉक-इन कालावधी संपत आहे. या १३ कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्या जुलै-ऑगस्टमध्ये शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत. या १३ कंपन्या कोणत्या आहेत आणि कोणत्या कंपनीचा लॉक-इन कालावधी ऑक्टोबरमध्ये किती काळ संपत आहे हे जाणून घेऊया.

३ महिन्याचा लॉक इन पीरिअड
या लिस्टमध्ये आयडिया फोर्जचा समावेश आहे. कंपनीच्या २० लाख शेअर्सचा लॉक इन पीरिअड ३ ऑक्टोबरला संपणार आहे. सिएंट जीएलएमच्या ५० लाख शेअर्सचा लॉक इन पीरिअडही ३ ऑक्टोबरला संपणार आहे. तर सेनको गोल्डच्या २० लाख शेअर्सचा लॉक इन पीरिअड १० ऑक्टोबरला आणि उत्कर्ष स्मॉल फायनान्स बँकेच्या ४.५ लाख शेअर्सचा लॉक इन पीरिअड १६ ऑक्टोबरला संपेल. तर दुसरीकडे नेटवेब टेक्नॉलॉजीच्या शेअर्सचा लॉक इन पीरिअड २३ ऑक्टोबरला आणि यथार्थ हॉस्पिटलच्या ३४ लाख शेअर्सचा लॉक इन पीरिअड ३१ ऑक्टोबरला संपणार आहे.

६ महिन्यांचा लॉक इन
या यादीत असलेल्या ३ कंपन्यांचे १८ ते ५० टक्के शेअर्स लॉक इन पीरिअड संपल्यानंतर ट्रेडिंगसाठी पात्र होतील. यामध्ये ग्लोबल सर्फेसेस, उदयशिवकुमार इन्फ्रा आणि एवलॉन टेकचा समावेश आहे.

१ वर्षांच्या यादीत ट्रॅक्सन टेक्नॉलॉजीज ही अशी एकमेव कंपनी आहे जिचा ३.९ कोटी  शेअर्ससाठीचा लॉक इन पीरिअड १८ ऑक्टोबरला संपणार आहे. तर १८ ते २४ महिन्यांच्या लॉक इन पीरिअडमध्ये वेरांडा लर्निंग या कंपनीच्या १.१ कोटी शेअर्सचा समावेश आहे.

ब्रोकिंग फर्म एंजल वनच्या १.६ कोटी शेअर्सचा लॉक इन पीरिअड ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आणि माझगाव डॉकच्या २० टक्के शेअर्सचा लॉक इन पीरिअड ९ ऑक्टोबरला संपेल.

Web Title: The lock in period of 23 crore shares of 13 companies will end on October see which shares are in the list details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.