Join us

डीमॅट खात्यांची संख्या पोहोचली १५ कोटींवर, आयपीओंचंही आकर्षण वाढतंय

By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 10:22 AM

दैनंदिन खर्चातून उरलेले पैसे बचत म्हणून वेगळे ठेवणे, भविष्यातील खर्चासाठी योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे, बचत केलेला पैसा आणखी वाढवणे यासाठी लोक विविध पर्यायाचांचा वापर करतात.

दैनंदिन खर्चातून उरलेले पैसे बचत म्हणून वेगळे ठेवणे, भविष्यातील खर्चासाठी योग्य ठिकाणी पैशांची गुंतवणूक करणे, बचत केलेला पैसा आणखी वाढवणे यासाठी लोक विविध पर्यायाचांचा वापर करतात. विविध कंपन्यांच्या शेअर्सची खरेदी, एसआयपीद्वारे तसेच म्युच्युअल फंडाद्वारे पैसे बाजारात गुंतविले जातात. अशा गुंतवणुकीच्या व्यवहारांसाठी डीमॅट खाते असावे लागते. देशातील एकूण डीमॅट खात्यांची संख्या मार्च २०२४ मध्ये १५.१४ कोटींवर पोहोचली आहे.  

चार वर्षांत झालेली वाढ (कोटींमध्ये) 

वर्ष    संख्या    वाढीचे प्रमाण२०२१        ५.४४    ३२.९%२०२२        ८.९७    ६५.०%२०२३        ११.४५    २७.६%२०२४        १५.१४    ३२.३% 

१०  कोटी डीमॅट खात्यांचा टप्पा  १९ महिन्यांपूर्वीच गाठला गेला होता. बाजारात लोकांचा विश्वास वाढल्याचे यातून दिसून येते.  ३.७० कोटी नवी डीमॅट खाती २०२३-२४ या आर्थिक वर्षात उघडण्यात आली. मागील वर्षाच्या तुलनेत यात ३२ टक्के वाढ झाली.  

गुंतवणूकदारांचा विश्वास वाढला 

  • मागील १२ महिन्यांत बाजारातील गुंतवणुकीने गुंतवणूकदारांना नवा विश्वास मिळाल्याचे दिसून ये आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात निफ्टीचा निर्देशांत २९ टक्क्यांनी वाढला. 
  • कोविड साथीनंतरच्या कालखंडातील हे सर्वोत्तम प्रदर्शन होते. या वर्षात स्मॉलकॅप निर्देशांक ७० टक्के तर मिडकॅप ६० टक्क्यांनी वाढल्याचे दिसून आले. 
  • फेडरल रिझर्व्हद्वारे दर कपातीची आशा, सरकारच्या स्तरावर काही वर्षांपासून अससेले स्थैर्य यामुळे इक्विटी मार्केटला चालना मिळाली. चालना देणारे काही घटक आहेत. 

आयपीओंचे वाढते आकर्षण  

  • अधिक नफा किंवा मोठा परतावा मिळेल या आशेने गुंतवणूकदारांनी आयपीओचा पर्यायही निवडला आहे. २०२३-२४ या आर्थिक वर्षात आलेल्या आयपीओंना जोरदार प्रतिसाद मिळाला. 
  • या वर्षांत ७६ कंपन्यांनी आयपीओद्वारे ६१,९२१ कोटी रुपये उभारले. आयपीओमध्ये गुंतवणुकीसाठी लोकांनी कुटुंबातील इतर सदस्यांच्या नावे डीमॅट खाती उघडली असण्याची शक्यता आहे.
टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग