रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपनी पार्श्वनाथ डेव्हलपर्सचे (Parsvnath Developers share) शेअर आठवड्याच्या तिसऱ्या व्यवहाराच्या दिवशी अर्थात बुधवारी जबरदस्त कोसळले आहेत. बीएसई इंडेक्सवर हा शेअर 7.66 रुपयांवर बंद झाला. कालच्या तुलनेत हा शेअर 4.49% ने घसरला आहे. 29 मार्च 2023 रोजी हा शेअर 6 रुपयांवर गेला होता. हा या शेयरचा 52 आठवड्यांतील निचांक होता. तसेच, 28 एप्रिल 2022 रोजी हा शेअर 18.55 रुपयांवर पोहोचला होता. हा 52 आठवड्यांतील उच्चांक होता.
केव्हा किती दिला परतावा -
या शेअरने एका आठवड्यात गुंतवणूकदारांना 6.54 टक्के एवढा सकारात्मक परतावा दिला आहे. हा शेअर 2 आठवड्यांत 18.21 टक्कांनी वधारला. याशिवाय एका महिन्यात 15 टक्के सकारात्मक परतावा मिळाला आहे. तसेच, तीन महिन्यांचा विचार करता, या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना तीन महिन्यांत 13 टक्क्यांचा निगेटिव्ह परतावा दिला आहे. एका वर्षात या शेअरने 57.21 टक्के एवढा निगेटिव्ह परतावा दिला आहे. तीन वर्षांच्या काळात या शेअरने 323.20 टक्के एवढा पॉझिटिव्ह परतावा दिला आहे. हा शेअर जानेवारी 2008 मध्ये 264 रुपयांवर पोहोचला होता. अर्थात या कालावधीत एक लाख रुपयांची गुंतवणूक कमी होऊन 2600 रुपयांवर आली आहे.
डिसेंबर तिमाहीचे निकाल -
गेल्या डिसेंबर तिमाहीत कंपनीला 160.82 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत हा तोटा 68.87 कोटी रुपये होता. या कंपनीचे एकूण उत्पन्न 87.75 कोटी रुपये एवढे आहे. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत 70.89 टक्क्यांनी घट झाली आहे. डिसेंबर 2021 च्या याच तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 301.44 कोटी रुपये एवढे होते.
पार्श्वनाथ डेव्हलपर्स लिमिटेड हाउसिंग, रिटेल आणि कॉमर्शिअल रिअल इस्टेट, टाउनशिप, आयटी पार्क, हॉटेल आणि एसईझेडचा प्रचार, बांदनी आणि विकासाचे उद्योग करते.