कर्जात बुडालेल्या अनिल अंबानी (Anil Ambani) प्रमोटेड रिलायन्स ग्रुप युनिट रिलायन्स कॅपिटलचा (Reliance Capital) गेल्या आर्थिक वर्षातील मार्चमध्ये संपलेल्या चौथ्या तिमाहीतील नेट तोटा (Net Loss) कमी होऊन 1,488 कोटी रुपयांवर आला आहे. यापूर्वीच्या आर्थिक वर्षातील समान तिमाहीत कंपनीला 4,249 कोटी रुपयांचा तोटा झाला होता. 4 जानेवारी 2023 रोजी 2762.60 रुपये होता. मगंळवारी कंपनीचे शेअर 0.45 टक्क्यांच्या तेजीने 8.84 रुपये होते.
शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत कंपनीने म्हटले आहे की, तिमाहीदरम्यान त्यांचे एकूण उत्पन्न कमी होऊन 4,436 कोटी रुपयेच राहिली आहे. जे एक वर्षापूर्वी समान तारखेला 4,770 कोटी रुपये होते. तिमाहीदरम्यान कंपनीचा एकूण खर्चदेखील 8,982 कोटी रुपयांनी कमी होऊन 5,949 कोटी रुपये राहिला आहे. तसेच, कंपनीला चौथ्या तिमाहीत 1,389 कोटी रुपयांचा घाटा झाला आहे. एका वर्षापूर्वी याच तिमाहीत कंपनीला स्वतंत्र आधारावर 25 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
स्टँडअलोन बेसीसवर कंपनीचे एकूण उत्पन्न कमी होऊन तीन कोटी रुपयेच राहिले आहे. जे एक वर्षापूर्वी सेम तिमाहीत पाच कोटी रुपये होते. कंपनी 29 नोव्हेंबर, 2021 पासून दिवाळखोरीच्या प्रक्रियेत आहे. महत्वाचे म्हणजे, कंपनीच्या शेअरच्या किंमतीत गेल्या एक महिन्या दरम्यान 12 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे.