Lokmat Money >शेअर बाजार > गुंतवणूकदारांची लागली वाट! 100 टक्क्यांनी आपटून ₹1 वर आला शेअर, 1 लाखाचे झाले 800 रुपये

गुंतवणूकदारांची लागली वाट! 100 टक्क्यांनी आपटून ₹1 वर आला शेअर, 1 लाखाचे झाले 800 रुपये

कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 5 दिवसांत 12 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 03:01 PM2023-03-20T15:01:42+5:302023-03-20T15:02:59+5:30

कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 5 दिवसांत 12 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे.

The Reliance naval and engineering share crash by 100 percent 1 lakh became 800 rupees | गुंतवणूकदारांची लागली वाट! 100 टक्क्यांनी आपटून ₹1 वर आला शेअर, 1 लाखाचे झाले 800 रुपये

गुंतवणूकदारांची लागली वाट! 100 टक्क्यांनी आपटून ₹1 वर आला शेअर, 1 लाखाचे झाले 800 रुपये

रिलायन्स समूहाच्या एका शेअरमध्ये जबरदस्त घसरण बघायला मिळत आहे. कंपनीच्या या शेअरमध्ये आज सोमवारी 5% पर्यंत घसरण दिसून आली. या शेअरची किंमत 1.96 रुपये आहे. हा शेअर रिलायन्स नेव्हल अण्ड इंजिनिअरिंगचा (Reliance Naval and Engineering Ltd) आहे. कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या 5 दिवसांत 12 टक्क्यांपर्यंत घसरण दिसून आली आहे. तसेच गेल्या 13 वर्षांत हा शेअर जवळपास 100 टक्क्यांनी घसरला आहे.

गुंतवणूकदारांना तगडा झटका - 
रिलायन्स नेव्हल अँड इंजिनिअरिंगचे शेअर्स गेल्या 13 वर्षांत जवळपास 100 टक्क्यांनी घसरले आहेत. या दरम्यान हे शेअर 116 रुपयांवरून (13 ऑगस्ट 2010 चा बंद भाव) घसरून 1 रुपयावर आले आहेत. अर्थात एक लाख रुपयांची गुंतवणूक कमी होऊन केवळ 800 रुपयेच राहिली आहे. महत्वाचे म्हणजे, गेल्या एक महिन्यात हा शेअर 20 टक्क्यांपर्यंत घसरला. तसेच, यावर्षात YTD मध्ये यात 22 टक्क्यांहून अधिकची घसरण झाली आहे.

या कंपन्यांनी लावलीय यशस्वी बोली -
स्वान एनर्जी आणि हेजल मर्केंटाइल यांनी संयुक्तपणे एका दिवाळखोरी प्रक्रियेअंतर्गत रिलायन्स नेव्हल अॅण्ड इंजिनिअरिंगच्या अधिग्रहणासाठी यशस्वी बोली लावली होती.  खरे तर, या कंपन्यांनी पैसे भरण्यासाठी चार महिन्यांचा अवधी मागितला आहे. अमेरिकन शॉर्ट-सेलर हिंडेनबर्ग रिसर्चने अदानी समूहावर केलेल्या आरोपांमुळे बाजारात निर्माण झालेल्या गोंधळाच्या वातावरणामुळे स्वान-हेज यांनी ही वेळ मागितली होती. महत्वाचे म्हणजे, एनसीएलटीने या दोन्ही कंपन्यांना संयुक्तपणे किमान 10 कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिले आणि प्रकरणाची पुढील सुनावणी 17 एप्रिलला होईल असे म्हटले आहे.

Web Title: The Reliance naval and engineering share crash by 100 percent 1 lakh became 800 rupees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.