Join us  

निकालाने बाजाराचा वारु उधळणार; मोदी सरकारच्या कार्यकाळात १५० टक्क्यांनी वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2023 6:07 AM

गंतवणूकदार मालामाल, ९ वर्षांत बाजाराचे बाजारमूल्य तब्बल ३ पट वाढले असून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १५० टक्केने वाढला आहे.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजाराने गुंतवणूकदारांना मालामाल केले. पाच वर्षांत बाजार १ लाखांवर पोहोचण्याची शक्यता आहे. भाजपच्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधील विजयाने बाजार आणखी गतीने वाढण्याची शक्यता बाजारतज्ज्ञांनी व्यक्त केली.

९ वर्षांत बाजाराचे बाजारमूल्य तब्बल ३ पट वाढले असून, मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक तब्बल १५० टक्केने वाढला आहे. गुंतवणूकदारांना २० लाख कोटी रुपयांचा फायदा झाला आहे. २०१४ मे २०२३ पर्यंत निफ्टी ५० चे बाजारमूल्य ३ पट वाढून २८ लाख कोटींवर गेले आहे. याचवेळी सूचीबद्ध कंपन्यांचे बाजारमूल्य १९५ लाख कोटींनी वाढले आहे. या काळात जागतिक गुंतवणूकदारांनी तब्बल ४९.२१ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतीय शेअर बाजारात केली असून, विदेशी गुंतवणूकदारांनी ७ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

शेअर बाजार १ लाखांवर का जाईल? पाच वर्षांत जर ईपीएस अर्थात प्रति शेअर कमाई १५ टक्के आणि प्राईज अर्गिन रेशो १९.८ पट राहिला तर पुढील पाच वर्षांत शेअर बाजार १ लाखांच्या वर जाईल, असा अंदाज जागतिक ब्रोकरेज फर्म जेफरीजने नुकताच व्यक्त केला. भारतीय अर्थव्यवस्थाही वाढत असल्याने गुंतवणूकदारांचा कल भारताकडे वाढला असल्याचे जेफरीजचे जागतिक धोरण प्रमुख ख्रिस वुड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :शेअर बाजार