Join us  

₹२५०० चा शेअर आला ₹१५५ वर, आता गुंतवणूदारांच्या उड्या; शेअरच्या किंमतीत झाली वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 5:52 PM

अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या शेअर्समध्येही तेजी दिसून झाली.

आठवड्याच्या कामकाजाच्या तिसऱ्या दिवशी बुधवारी शेअर बाजाराने पुन्हा एकदा नव्या उच्चांकाला स्पर्श केला. यादरम्यान अनिल अंबानी यांची कंपनी रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या (Reliance Infrastructure Ltd) शेअर्समध्येही तेजी दिसून झाली. ट्रेडिंग दरम्यान, या शेअरमध्ये सुमारे 10 टक्क्यांची वाढ होऊन शेअर 157.15 रुपयांवर पोहोचला होता. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात कंपनीचा शेअर 154.50 रुपयांवर आला. सप्टेंबर 2022 मध्ये हा शेअर 201.35 रुपयांवर गेला होता. 52 आठवड्यांतील ही शेअरची उच्चांकी पातळी होती. तर, जुलै 2022 मध्ये, स्टॉकनं 100.75 रुपयांच्या 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर गाठला होता.

रिलायन्स इन्फ्राच्या शेअरनं तीन वर्षांत 375 टक्के पॉझिटिव्ह रिटर्न दिले आहेत. त्याच वेळी, दोन वर्षांच्या कालावधीत सुमारे 100 टक्के आणि एका वर्षाच्या कालावधीत 55 टक्के परतावा मिळाला आहे. 2008 मध्ये शेअरनं 2500 रुपयांची पातळी गाठली होती. हा तो काळ होता जेव्हा जग मंदीच्या गर्तेत होतं आणि भारतातील शेअर बाजारात मोठी घसरण झाली होती.

तीन असेट्स विकणारअलीकडेच, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरच्या तीन मालमत्ता विकल्या जाणार असल्याच्या बातम्या आल्या होत्या. क्यूब हायवेज, ब्रुकफील्ड आणि कॅनडा पेन्शन प्लॅन इन्व्हेस्टमेंट बोर्ड (CPPIB) यासह आघाडीचे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक फंड हे खरेदी करण्याच्या शर्यतीत आहेत. या मालमत्तांसाठी 2,000 कोटी रुपयांचे व्हॅल्यूएशन निश्चित करण्यात आले आहे. बिझनेस स्टँडर्डच्या वृत्तानुसार, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर महाराष्ट्रात पुणे सातारा टोल रोड (पीएस टोल रोड), तामिळनाडूतील होसूर-कृष्णागिरी टोल रोड (एचके टोल रोड) आणि सेलम-उलंदरपेट टोल रोडची (एसयू टोल रोड) विक्री करण्याच्या मूडमध्ये आहे. तीनही टोल रस्त्यांची एकूण लांबी सुमारे 350 किमी आहे. रिलायन्स इन्फ्राच्‍या पोर्टफोलिओमध्‍ये सध्‍या 700 किमी पेक्षा जास्त लांबीच्या सुरू असलेल्या नऊ रस्‍ते प्रकल्पांचा समावेश आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक