Lokmat Money >शेअर बाजार > ₹६३४ वरून ₹३ वर आपटला हा शेअर, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹४७३; आता 'अच्छे दिन येणार'?

₹६३४ वरून ₹३ वर आपटला हा शेअर, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹४७३; आता 'अच्छे दिन येणार'?

शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदांना कंगाल केलंय. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामालही केलंय. तु

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 11:48 AM2023-07-17T11:48:39+5:302023-07-17T11:49:09+5:30

शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदांना कंगाल केलंय. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामालही केलंय. तु

The share fell to rs 3 from 634 1 lakh investment become now rs 473 might come good days to investors | ₹६३४ वरून ₹३ वर आपटला हा शेअर, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹४७३; आता 'अच्छे दिन येणार'?

₹६३४ वरून ₹३ वर आपटला हा शेअर, १ लाखांच्या गुंतवणूकीचे झाले ₹४७३; आता 'अच्छे दिन येणार'?

Future Retail share: शेअर बाजारात असे काही शेअर्स आहेत ज्यांनी गुंतवणूकदांना कंगाल केलंय. तर असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामालही केलंय. तुम्ही उदाहरण म्हणून फ्युचर समूहाच्या कंपनीकडे पाहू शकता. या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना मोठं नुकसान सोसावं लागलं आहे. फ्युचर रिटेलचा शेअर सद्यस्थितीत ३ रुपयांवर आला आहे.  परंतु एक अशी वेळ होती जेव्हा या कंपनीचा शेअर ६३४ रुपयांवर (२४ नोव्हेंबर २०१७) होता. सध्या या शेअरनं आपल्या स्टेबल गुंतवणूकदारांना १०० टक्के नुकसान केलं आहे. 

शेअर्सची परिस्थिती
सध्या फ्युचर रिटेलच्या शेअर्सवर लक्ष आहे आणि कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्यानं तेजी दिसून येत आहे. शुक्रवारी कंपनीच्या शेअर्समध्ये ५ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं होतं. यानंतर कंपनीचे शेअर्स ३.२५ रुपयांवर पोहोचले होते. सोमवारीही कंपनीच्या शेअर्सला अपर सर्किट लागलं असून शेअर ३.३५ रुपयांवर पोहोचले.

कंपनीला येणार अच्छे दिन?
रिलायन्स रिटेल व्हेन्चर्स लिमिटेड सह तीन कंपन्यांना फ्युचर एन्टरप्रायझेस लिमिटेडच्या संभाव्य खरेदीदारांच्या रुपात निवडलं आहे. एफईएल सध्या दिवाळखोरी प्रक्रियेतून जात आहे. संभाव्य खरेदीदारांच्या यादीत जिंदाल (इंडिया) आणि पॉलिएस्टर विस्कोस आणि जीबीटीएल या कंपन्यांचाही समावेश आहे. या निवडलेल्या कंपन्यांना २४ ऑगस्ट २०२३ पर्यंत त्यांचे रिझोल्यूशन प्लॅन सबमिट करावे लागतील.

(टीप - कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: The share fell to rs 3 from 634 1 lakh investment become now rs 473 might come good days to investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.