Join us  

सातत्यानं होतेय शेअरच्या किंमतीत वाढ, अयोध्येशीही जोडलं गेलंय कंपनीचं नाव; गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2024 11:12 AM

अयोध्येशी जोडल्या गेलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे.

Allied Digital Services share price: अयोध्या येथे २२ जानेवारी रोजी राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडणार आहे. परंतु त्यापूर्वीच अयोध्येशी जोडल्या गेलेल्या कंपनीचे शेअर्स खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांनी रस दाखवला आहे.  मुंबईस्थित कंपनी अलाइड डिजिटल सर्व्हिसेसचे (एडीएसएल) कनेक्शनही अयोध्येशी जोडलं गेलं आहे. यामुळे गुंतवणूकदार कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करताना दिसतायत. कंपनीनं अयोध्या स्मार्ट सिटी प्रकल्पाचं कंत्राट जिंकलं आहे.

शेअर्समध्ये तेजी

हा स्मॉलकॅप स्टॉक फक्त दोन ट्रेडिंग सेशन्समध्ये 37.6 टक्क्यांनी वाढला. आठवड्याच्या अखेरच्या ट्रेडिंगच्या दिवशी शेअरची 173.90 रुपये होती. शेअरच्या किमतीत एका दिवसापूर्वीच्या तुलनेत 1.76 टक्क्यांची वाढ झाली आहे. दरम्यान, ट्रेडिंग दरम्यान शेअरची किंमत 14.7 टक्क्यांनी ने वाढून 196.05 रुपये झाली होती. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. या मायक्रोकॅप कंपनीचे बाजार भांडवलही शुक्रवारी 1,000 कोटी रुपयांच्या पुढे गेले. शेअरचा 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 71.50 रुपये आहे. शेअरनं 28 मार्च 2023 रोजी ही पातळी गाठली होती.

काय आहेत प्रकल्पाच्या डिटेल्स?

अलाईड डिजिटल सर्व्हिसेसनं गुरुवारी घोषणा केली त्यांना अयोध्या स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी आयटीएमएस नियंत्रण कक्षासोबत सीसीटीव्ही पाळतीच्या इंटिग्रेशनसाठी मास्टर सिस्टम इंटिग्रेटर म्हणून निवड करण्यात आली आहे. या अंतर्गत नवीन कॅमेरे बसवणे, सध्याचे सीसीटीव्ही सर्व्हिलन्स कॅमेरे एकाच सिस्टीम नेटवर्कमध्ये आणणे यासह अन्य कामे केली जाणार आहेत. अयोध्येशी संबंधित शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. यामध्ये अपोलो सिंदूरी हॉटेल्स, प्रवेग, जेनेसिस इंटरनॅशनल, इंडियन हॉटेल्स, IRCTC, इंडिगो आणि स्पाइसजेट यांचा समावेश आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारअयोध्याराम मंदिरगुंतवणूक