Join us  

₹६ च्या शेअरनं पकडला जबरदस्त स्पीड, सलग ३ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 01, 2024 3:31 PM

महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 मार्च रोजी शेअर बाजारानं आपला पूर्वीचा विक्रम मोडला आणि नवीन उच्चांक गाठला.

Aadi industries share price : महिन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 मार्च रोजी शेअर बाजारानं आपला पूर्वीचा विक्रम मोडला आणि नवीन उच्चांक गाठला. या सकारात्मक वातावरणात अनेक पेनी स्टॉक्सनाही गती मिळाली आहे. पेट्रोकेमिकल क्षेत्राशी संबंधित असलेल्या आदि इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्येही जोरदार वाढ झाली असून आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी या शेअरला अपर सर्किट लागलं. 

शेअरची स्थिती काय ? 

शुक्रवारी हा शेअर 6.01 रुपयांच्या आधीच्या बंद किमतीपेक्षा 5 टक्क्यांनी वाढून 6.31 रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा अपर सर्किट बँडही आहे. यापूर्वी सलग तीन दिवस शेअरमध्ये अपर सर्किट दिसून आलं होतं. एका आठवड्यात हा शेअर 15 टक्क्यांहून अधिक वाढलाय. दरम्यान, शेअर अजूनही 8.90 रुपयांच्या 52 आठवड्यांच्या उच्चांकी स्तरापेक्षा खाली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात शेअरनं ही पातळी गाठली होती. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात हा शेअर 3.01 रुपयांच्या नीचांकी पातळीवर पोहोचला होता. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर होता. 

कोणाचा किती हिस्सा 

शेअरहोल्डिंग पॅटर्नबद्दल सांगायचं झालं तर डिसेंबर तिमाहीदरम्यान आदि इंडस्ट्रीजमध्ये प्रमोटर्सचा हिस्सा 24.86 टक्के आहे. तर दुसरीकडे पब्लिक शेअर होल्डिंग 75.14 टक्के आहे. या कंपनीचे इंडिविज्युअल प्रमोटर रिषभ साह आहेत. त्यांच्याकडे कंपनीचे 24,86,429 शेअर्स आहेत. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजार