Join us

₹२८०० वरुन ₹११ वर आला हा शेअर, आता तोट्यातून नफ्यात आली कंपनी; दिग्गज कंपनीचं जोडलंय नाव

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2024 2:49 PM

कंपनीला या तिमाहीत नफा झाला आहे.

दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात असलेल्या अनिल अंबानींची कंपनी रिलायन्स कॅपिटलनं डिसेंबर तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. या तिमाहीत कंपनीला 39.37 कोटी रुपयांचा नफा झाला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीला तोटा झाला होता. कंपनीच्या विक्रीत 15.97 टक्क्यांची वाढ झाली आहे आणि ती 6097.17 कोटी रुपयांवर पोहोचली. मागील वर्षी याच तिमाहीत विक्री 5257.68 कोटी रुपये झाली होती. 

दरम्यान, हिंदुजा समूह सध्या 4,000 कोटी रुपयांचे कर्ज मिळवण्यासाठी नॉन-बँकिंग वित्तीय कंपनी 360 वन प्राइमशी (पूर्वीचे IIFL वेल्थ प्राइम) चर्चा करत असल्याचं वृत्त आहे. हा निधी रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी वापरला जाईल. इंडसइंड इंटरनॅशनल होल्डिंग्जच्या (IIHL) मालकीच्या हिंदुजा समुहानं रिलायन्स कॅपिटलच्या अधिग्रहणासाठी सर्वात मोठी बोली लावली होती. यासाठी एकूण 8,000 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे.

 

सध्या ट्रेडिंग बंद 

रिलायन्स कॅपिटलचं ट्रेडिंग केल्या काही दिवसांपासून बंद आहे. सध्या रिलायन्स कॅपिटलच्या शेअरची किंमत 11.78 रुपये आहे. बीएसई इंडेक्सवर ट्रेडिंग बंद असल्याचा मेसेज दिसत आहे. त्यामुळे सामान्य गुंतवणूकदार शेअर्सची खरेदी विक्री करू शकत नाही. जानेवारी 2006 मध्ये या शेअरची किंमत 2800 रुपये होती. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही )

टॅग्स :रिलायन्सशेअर बाजार