Pramara Promotions IPO Listing Today : शेअर बाजारात बुधवारी प्रमारा प्रमोशन आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग झालं. प्रमोशनल प्रोडक्ट्स आणि गिफ्ट आयटम तयार करणाऱ्या कंपनीचे एनएसईवर जबरदस्त लिस्टिंग झालं. Pramara Promotions चे शेअर्स आपल्या इश्यू प्राईज ६३ रुपयांच्या तुलनेत ७६.१९ टक्के प्रिमिअमवर म्हणजेच १११ रुपयांवर लिस्ट झाले. लिस्टिंगनंतर शेअर्समध्ये तेजी कायम होती आणि हा शेअर ११६ रुपयांपर्यंत पोहोचला. ज्यांना हा आयपीओ अलॉट झाला त्यांना लिस्टिंगवरच तब्बल ८५ टक्क्यांचा नफा झाला आहे.
प्रमारा प्रमोशन आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला होता. ५ सप्टेंबर रोजी हा २५.६ पट सबस्क्राईब झाला आणि रिटेल सेगमेंटमध्ये १७.०१ पट आणि नॉन रिटेलमध्ये ३३.९६ पट सबस्क्राईब झाला होता. ५ सप्टेंबर २०२३ रोजी हा आयपीओ ओव्हरसबक्राईब झाला होता.
प्रमारा प्रमोशनने आपल्या आयपीओसाठी प्रति शेअर ६३ रुपये निश्चित किंमत निश्चित केली होती. या आयपीओसाठी २००० शेअर्सची लॉट साइज निश्चित करण्यात आली होती. म्हणजेच या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान १,२६,००० रुपये आवश्यक होते.
काय करते कंपनी
प्रमारा प्रमोशन्स लिमिटेड ही प्रमोशनल मार्केटिंग एजन्सी असून त्याची सुरुवात २००६ मध्ये झाली होती. हे प्रमोशनल प्रोडक्ट्स आणि गिफ्ट्सचं उत्पादन आणि मार्केटिंगला डिझाइन करकणं, सकल्पना अशा व्यवसायात गुंतलेले आहे. कंपनीच्या क्लायंट लिस्टमध्ये एफएमजीसी (फास्ट मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स), क्युएसआर (क्विक सर्व्हिस रेस्टॉरंट्स), फार्मा, बेव्हरेज कंपन्या, कॉस्मेटिक्स, टेलिकॉम आणि मीडिया या उद्योग समूहांचा समावेश आहे. कंपनी OEM व्यवस्थेअंतर्गत उत्पादनं तयार करण्याची व्यवस्था देखील करते. प्रमारा प्रमोशन लिमिटेडने आजपर्यंत ५ हजारांहून अधिक प्रोडक्ट डिझाईन आणि त्यांचं उत्पादन केलंय.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)