Lokmat Money >शेअर बाजार > आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण; १ लाख कोटी बुडाले, कोणते शेअर्स वधारले?

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण; १ लाख कोटी बुडाले, कोणते शेअर्स वधारले?

26 फेब्रुवारी रोजी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 04:30 PM2024-02-26T16:30:45+5:302024-02-26T16:30:55+5:30

26 फेब्रुवारी रोजी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला

The stock market falls on the first day of the week 1 lakh crore sunk which shares have increased | आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण; १ लाख कोटी बुडाले, कोणते शेअर्स वधारले?

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात घसरण; १ लाख कोटी बुडाले, कोणते शेअर्स वधारले?

Share Market Today: 26 फेब्रुवारी रोजी आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. सेन्सेक्स 352 अंकांनी तर निफ्टी 22,150 च्या खाली घसरला. त्यामुळे आज शेअर बाजारातील गुंतवणूकदारांच्या संपत्ती सुमारे एक लाख कोटी रुपयांची घट झाली. व्यवहाराच्या अखेरीस बीएसई सेन्सेक्स 352.66 अंकांनी किंवा 0.48% घसरून 72,790.13 वर बंद झाला. तर एनएसईचा 50 शेअर्सचा निर्देशांक निफ्टी 90.65 अंकांनी किंवा 0.41% ने घसरला आणि 22,122.05 च्या पातळीवर बंद झाला.
 

बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं एकूण बाजार भांडवल आज 26 फेब्रुवारी रोजी 392.01 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलं, जे त्याच्या आधीच्या ट्रेडिंग दिवशी म्हणजे शुक्रवार, 23 फेब्रुवारी रोजी 393.04 लाख कोटी रुपये होते. अशा प्रकारे, बीएसईवरील लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप आज सुमारे 1.03 लाख कोटी रुपयांनी कमी झालं आहे. किंवा दुसऱ्या शब्दांत सांगायचं झालं तर गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सुमारे 1.03 लाख कोटी रुपयांची घट झालीये.
 

कोणते शेअर्स वधारले?
 

बीएसई सेन्सेक्समधील 30 पैकी केवळ 5 शेअर्स आज वाढीसह बंद झाले. यामध्ये देखील लार्सन अँड टुब्रोच्या (L&T) शेअर्समध्ये सर्वाधिक 2.36% वाढ झाली आहे. यानंतर पॉवर ग्रिड, हिंदुस्तान युनिलिव्हर (एचयूएल), एचडीएफसी बँक आणि नेस्ले इंडियाचे शेअर्स वधारले आणि 0.08% ते 1.97% पर्यंतच्या वाढीसह बंद झाले.
 

या शेअर्समध्ये घसरण
 

तर उर्वरित 25 शेअर्स घसरणीसह बंद झाले. यामध्येही एशियन पेंट्सचे शेअर्स 3.9 टक्क्यांनी घसरले. तर टाटा स्टील, टायटन, टेक महिंद्रा आणि भारती एअरटेलचे शेअर्स 1.46% ते 1.99% च्या घसरणीसह बंद झाले.

Web Title: The stock market falls on the first day of the week 1 lakh crore sunk which shares have increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.