Stock Market Closing On 29 December 2023: शेअर बाजारानं घसरणीसह आज 2023 या वर्षाचा निरोप घेतला. वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात, सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद झाले. परंतु मिड कॅप आणि स्मॉल कॅप स्टॉक्स ग्रीन झोनमध्ये दिसून आले. कामकाजाच्या अखेरच्या सत्रात बीएसई सेन्सेक्स 170 अंकांच्या घसरणीसह 72,240 अंकांवर बंद झाला, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 47 अंकांच्या घसरणीसह 21,730 अंकांवर बंद झाला.
2022 च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात 30 डिसेंबर रोजी सेन्सेक्स 60,840 अंकांवर बंद झाला, जो आज 72,240 अंकांवर बंद झाला. म्हणजेच एका वर्षात सेन्सेक्समध्ये १८.७३ टक्क्यांची वाढ झाली. तर 2022 या वर्षाच्या अखेरच्या सत्रात निफ्टी 18,105 वर बंद झाला, जो 2023 च्या शेवटच्या सत्रात 21,731 वर बंद झाला. एका वर्षात निफ्टी 3625 अंकांनी किंवा 20 टक्क्यांनी वाढला आहे.रेकॉर्ड हायवर मार्केट कॅपबीएसईवर लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप वर्षाच्या शेवटच्या ट्रेडिंग सत्रात विक्रमी उच्चांकावर बंद झालं. आजच्या सत्रात, लिस्टेड कंपन्यांचं मार्केट कॅप 364.05 लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील सत्रात 363 लाख कोटी रुपये होते. वर्ष 2022 च्या शेवटच्या ट्रेडिंग सत्राशी तुलना केल्यास, गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 82 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे. 2022 च्या शेवटच्या सत्रात मार्केट कॅप 282.44 लाख कोटी रुपये होते.