Lokmat Money >शेअर बाजार > शेअर बाजारचा वारू सुसाट, घाेडदाैडीचा नवा उच्चांक

शेअर बाजारचा वारू सुसाट, घाेडदाैडीचा नवा उच्चांक

शेअर बाजारात २६ जूनपासून जाेरदार तेजीचे वातावरण आहे

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2023 06:48 AM2023-07-21T06:48:02+5:302023-07-21T06:59:04+5:30

शेअर बाजारात २६ जूनपासून जाेरदार तेजीचे वातावरण आहे

The stock market is booming, the new high of Gheddaidi | शेअर बाजारचा वारू सुसाट, घाेडदाैडीचा नवा उच्चांक

शेअर बाजारचा वारू सुसाट, घाेडदाैडीचा नवा उच्चांक

लाेकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेअर बाजारातील तेजीला सध्या काेणताही स्पीडब्रेकर राेखताना दिसत नाही. शेअर बाजाराने गुरुवारी माेठी उसळी घेत पुन्हा नवा उच्चांक गाठला. सेन्सेक्स ४७४ तर निफ्टी १५६ अंकांनी वधारले. गेल्या सहा सत्रांमध्ये सेन्सेक्स तब्बल २,१७८ अंकांनी वधारला आहे. तसेच, निफ्टी २० हजार अंकांच्या जवळ पाेहाेचला आहे.

शेअर बाजारात २६ जूनपासून जाेरदार तेजीचे वातावरण आहे. सेन्सेक्स २६ जून राेजी ६२,९७० अंकांवर बंद झाला हाेता. तेव्हापासून सेन्सेक्स ४,६०१ अंकांनी वाढला आहे. जुलैच्या पहिल्याच दिवशी सेन्सेक्स ६४ हजारांवर पाेहाेचला हाेता. नंतर २० दिवसांत ताे ६७ हजारांवर पाेहाेचला.

तेजी कशामुळे?
जुलै महिन्यात बहुतांश कंपन्यांचे तिमाही निकाल जाहीर झाले आहेत. अनेक कंपन्यांनी भरघाेस नफा कमावित दमदार कामगिरी नाेंदविली आहे. याशिवाय एकूण कमी झाली महागाई आणि स्थिर व्याजदर, यामुळे शेअर बाजारात गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे. 

सेन्सेक्स      ६७,५७१
निफ्टी         १९,९७९

Web Title: The stock market is booming, the new high of Gheddaidi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.