Join us

1000 टक्क्यांनी वाढला या 131 वर्षं जुन्या कंपनीचा स्टॉक, 6 वरून 73 रुपयांवर पोहोचला शेअरचा भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2023 4:13 PM

बाटलीबोई लिमिटेड, ही देशातील सर्वात जुन्या इंजिनिअरिंग कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची सुरुवात 1892 मध्ये झाली होती.

इंजिनिअरिंग कंपनी बाटलीबोई लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या 3 वर्षांत जबरदस्त तेजी दिसून येत आहे. बाटलीबोई लिमिटेडच्या (Batliboi Limited) शेअर्सनी गेल्या 3 वर्षांत आप्या इनव्हेस्टर्सना 1000 टक्क्यांहून अधिकचा परतावा दिला आहे. सध्या कंपनीचा शेअर 6 रुपयांवरून 73 रुपयांवर पोहोचा आहे. या कंपनीचा 52 आठवड्यांतील उच्चांक 74.20 रुपये एवढा आहे. बाटलीबोई लिमिटेड, ही देशातील सर्वात जुन्या इंजिनिअरिंग कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीची सुरुवात 1892 मध्ये झाली होती.

गुंतवणूकदार केवळ 3 वर्षांतच मालामाल -बाटलीबोई लिमिटेडचा शेअर 3 एप्रिल 2020 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 6.50 रुपयांवर होता. तो 25 एप्रिल 2023 रोजी बीएसईवर 73.40 रुपयांवर पोहोचला आहे. या कंपनीच्या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या गुंतणूकदारांना तब्बल 1013 पर्सेंटचा परतावा दिला आहे. जर एखाद्या व्यक्तीने 3 एप्रिल 2020 रोजी बाटलीबोई लिमिटेडच्या शेअरमध्ये 1 लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याचे 11.43 लाख रुपये झाले असते.

देल्या 6 महिन्यांत 93 टक्यांहून अधिकची तेजी - बाटलीबोई लिमिटेडच्या शेअरमध्ये गेल्या 6 महिन्यांत 93 टक्क्यांहून अधिकची तेजी आली आहे. कंपनीचा शेअर 25 ऑक्टोबर 2022 रोजी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजवर (BSE) 37.90 रुपयांवर होता. तो 25 एप्रिल 2023 रोजी बीएसईवर 73.40 रुपयांवर पोहोचला आहे. कंपनीच्या शेअरचा 52 आठवड्यांतील निचांक 28 रुपये आहे. बाटलीबोई लिमिटेड मशीन टूल्स, टेक्सटाईल एअर इंजिनिअरिंग, टेक्सटाईल मशीनरी, एअर कंडिशनिंग, एनव्हायरमेन्टल इंजिनिअरिंग, विंड एनर्जी बिझनेसशी संबंधित आहे.(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसा