सध्या दलाल मार्केटमध्ये येस बँकेच्या शेअर्सची जबरदस्त चर्चा सुरू आहे. प्रायव्हेट बँकेच्या शेअरची किंमत 13 डिसेंबर 2022 रोजी 24.75 च्या आपल्या 52- आठवड्यांतील उच्चांकावर होती. साधारणपणे एका महिन्याच्या कालावधीत येस बँकेच्या शेअरमध्ये 30 टक्क्यांची घसरण दिसून आली आहे. तसेच या वर्षात YTD मध्ये हा शेअर 20 टक्क्यांहून अधिक घसरला आहे. येस बँकेचा शेअर सध्या 17.45 रुपयांवर आहे.
कंपनीच्या शेअरची स्थिती -
येस बँकेचे शेअर गेल्या वर्षभरात 95 टक्के घसरले आहेत. या काळात हे शेअर 349 रुपयांवरून घसरून 17.45 रुपयांवर आले आहेत. अर्थात एक लाखाची गुंतवणूक कमी होऊन 5000 रुपयेच राहिली आहे. गेल्या पाच कामकाजाच्या दिवसांत हा शेअर 12.75 टक्क्यांनी घसरला.
काय म्हणताय एक्सपर्ट? -
शेअर बाजारातील एक्सपर्टनुसार, 'येस बँकच्या शेअरमधील ही घसरण काही काळासाठीच आहे. तज्ज्ञांच्या मते, 'येस बैंक आपल्या निचांकी पातळीवरून पुन्हा उभारी घेईल, आशी आशा आहे. तिसऱ्या तिमाहीतील परिणाम आणि नुकताच आलेला मुंबई हाय कोर्टाच्या आदेशानंतर, या बँकेच्या शेअरची किंमत घटली आहे. महत्वाचे म्हणजे, येणाऱ्या दिवसांत यात तेजी येण्याचीही सक्यता आहे.'
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)