कोरोनाने पुन्हा डोकं वर काढल्यामुळे सर्वत्र चिंताग्रस्त वातावरण निर्माण झालंय. चीनमध्ये लॉकडाऊन लागल्यानंतर आता भारतातही पुन्हा शट डाऊन होते की काय याची काळजी सर्वांना लागली आहे. अर्थातच शेअर मार्केटमध्येही मंदी पाहायला मिळत आहे. मात्र, कोरोनाच्या सावटातही एका कंपनीच्या शेअर्समध्ये चांगली गुंतवणूक पाहायला मिळत आहे. या शेअर्सच्या खरेदीसाठी गुंतवणूकदारांची गर्दी होत आहे. कारण, गेल्या ३ महिन्यात या कंपनीच्या शेअर्संने तब्बल ७१० टक्क्यांचे रिटर्न्स दिले आहेत. विशेष म्हणजे कंपनीने आता बोनस आणि स्टॉक स्प्लिटचीही घोषणा केली आहे. त्यामुळे, गुंतवणूकदारांचा फायदाच फायदा आहे.
शेअर बाजारात सगल तिसऱ्या दिवशीही मंदी पाहायला मिळत आहे. स्टॉक मार्केटमध्ये मुंबई आणि निफ्टी दोन्ही मार्केटमध्ये लाल दिवाच पाहायला मिळाला. मात्र, मार्केटमध्ये मंदी असतानाही टीएमटी स्टील विकणाऱ्या एसएमई कंपनी Rhetan TMT चे शेअर्स चांगलेच वधारले आहेत. इंट्रा डे मध्ये या शेअर्सने ४ टक्क्यांची उसळी घेतली आहे. त्यामुळे, हा शेअर ४६९.५० या उच्चतम अंकावर पोहोचला आहे. उच्चतम अंकावर आल्यानंतर Rhetan TMT च्या शेयर्संमध्येही थोडी गिरावट पाहायला मिळाली. मात्र, शेवटी बाजार बंद झाल्यानंतर या शेअर्संमध्ये २ टक्के तेजी दिसून आली. त्यामुळे, मार्केट बंद होताना हा शेअर्स ४५६ अंकांवर पोहोचला होता. गेल्या तीन महिन्यात या कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना तब्बल ७१० टक्क्यांचं जबरदस्त फायदेशीर रिटर्न्स गिफ्ट दिलं आहे.
RHETAN TMT Share कंपनीच्या गेल्या तीन महिन्यातील दर पाहिला असता, 5 सप्टेंबर रोजी बाजार बंद होताच ६६.५० रुपयांवर हा शेअर होता. तर गुरुवार 22 डिसेबर 2022 रोजी कंपनीचा स्टॉक प्राइस ४५६ रुपयांवर पोहोचला आहे. Rhetan ही बांधकाम क्षेत्रात वापरात येणारे टीएमटी स्टील आणि गोल सळया उत्पादन करणारी कंपनी आहे. २०२१-२२ मध्ये कंपनीला २.३५ कोटींचे नेट प्रॉफिट झाले होते.