Join us  

शेअर बाजारात हे 2 डिफेन्स स्टॉक देतायत बम्पर परतावा, तुमच्याकडे आहेत का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 11:06 PM

गेल्या एका वर्षात डिफेन्स क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे...

गेल्या एका वर्षात डिफेन्स क्षेत्रातील दोन कंपन्यांच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. या कालावधीत, ज्या कंपन्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना बम्पर परतावा दिला, त्यांत हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आणि भारत डायनॅमिक लि. चाही समावेश आहे. या दोन्ही कंपन्यांकडे वर्क ऑर्डरची मोठी लिस्ट आहे.

हिंदुस्तान एयरोनॉटिक्स लिमिटेड -गेल्या एका वर्षात या डिफेन्स कंपनीच्या शेअरच्या किंमतीत 63 टक्क्यांहून अधिक तेजी दुसून आली आहे. तसेच, गेल्या 6 महिन्यांपूर्वी या शेअरमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आतापर्यंत 36 टक्क्यांहून अधिकचा परतावा मिळाला आहे. गुंतवणूकदारांच्या मते गेला एक महिनाही जबरदस्त राहिला आहे. कंपनीचे एकूण मार्केट कॅप 1,37,781 कोटी रुपये एवढे आहे.

भारत डायनॅमिक्स लिमिटेड - शेअर बाजारात भारत डायनॅमिक्सची कामगिरी HAL च्या तुलनेत फार चांगली नसली, तरी या शेअरने लॉन्ग टर्ममध्ये आपल्या गुंतवणूकदारांना निराश केलेले नाही. गेल्या 5 वर्षांत या डिफेन्स स्टॉकची किंमत 283 टक्क्यांहून अधिकने वाढली आहे. तर, गेल्या एका वर्षात या शेअरच्या किंमतीत 17 टक्क्यांहून अधिकची वाढ दिसून आली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूकपैसा