Lokmat Money >शेअर बाजार > RailTel सह 'या' ४ कंपन्यांना मिळाला 'नवरत्न'चा दर्जा, सोमवारी शेअर्सवर दिसू शकतो परिणाम

RailTel सह 'या' ४ कंपन्यांना मिळाला 'नवरत्न'चा दर्जा, सोमवारी शेअर्सवर दिसू शकतो परिणाम

Navratna companies: गुरुवारी ४ नव्या सरकारी कंपन्यांना सरकारकडून नवरत्नाचा दर्जा देण्यात आला. आता या कंपन्यांची संख्या २१ वरून २५ झालीये. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2024 02:11 PM2024-08-31T14:11:12+5:302024-08-31T14:11:29+5:30

Navratna companies: गुरुवारी ४ नव्या सरकारी कंपन्यांना सरकारकडून नवरत्नाचा दर्जा देण्यात आला. आता या कंपन्यांची संख्या २१ वरून २५ झालीये. पाहा कोणत्या आहेत या कंपन्या.

These 4 companies along with RailTel get Navratna status the effect can be seen in shares on Monday | RailTel सह 'या' ४ कंपन्यांना मिळाला 'नवरत्न'चा दर्जा, सोमवारी शेअर्सवर दिसू शकतो परिणाम

RailTel सह 'या' ४ कंपन्यांना मिळाला 'नवरत्न'चा दर्जा, सोमवारी शेअर्सवर दिसू शकतो परिणाम

Navratna companies: गुरुवारी ४ नव्या सरकारी कंपन्यांना सरकारकडून नवरत्नाचा दर्जा देण्यात आला. या चार कंपन्यांमध्ये रेलटेल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, सोलर एनर्जी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड आणि सतलज जल विद्युत निगम (SJVN) यांचा समावेश आहे. अर्थ मंत्रालयाने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सद्वारे ही माहिती दिली आहे.

या ४ कंपन्यांपैकी ३ कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. या तीन कंपन्या म्हणजे रेलटेल, एसजेव्हीएन आणि एनएचपीसी. सोमवारी या कंपन्यांचे शेअर्स फोकसमध्ये असू शकतात. आता हे शेअर्स कशी कामगिरी करतील हे पाहावं लागेल. नवरत्न कंपन्यांमध्ये ४ कंपन्यांची नावे जोडल्यानंतर आता नवरत्न कंपन्यांची संख्या २१ वरून २५ झाली आहे.

कोणत्या आहेत यापूर्वीच्या २१ कंपन्या?

  • भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड
  • कंटेनर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
  • इंजिनीअर्स इंडिया लिमिटेड
  • हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड
  • महानगर टेलिफोन निगम लिमिटेड
  • नॅशनल अॅल्युमिनियम कंपनी लिमिटेड
  • नॅशनल बिल्डिंग्स कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशन लिमिटेड
  • नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लिमिटेड
  • एनएमडीसी लिमिटेड
  • राष्ट्रीय इस्पात निगम लिमिटेड
  • शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
  • रेल विकास निगम लिमिटेड
  • ओएनजीसी विदेश लिमिटेड
  • राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड
  • इरकॉन इंटरनॅशनल
  • रिट्स
  • नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड
  • सेंट्रल वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशन
  • एचयूडीसीएल
  • इरेडा
  • माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड


(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: These 4 companies along with RailTel get Navratna status the effect can be seen in shares on Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.