Suzlon Energy New High : गेल्या काही दिवसांत शेअर बाजारात चढ उतार दिसून आलेत. पण असेही काही शेअर्स आहेत ज्यांनी बाजारात घसरण असतानाही आपल्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिलाय. या लेखात आपण बाजारातील त्या चार शेअर्सबद्दल माहिती घेऊ ज्यांनी 52 आठवड्यांचा नवा उच्चांकी स्तर गाठलाय. याशिवाय, या चार शेअर्सनं गेल्या महिन्याभराच्या कालावधीत त्यांच्या गुंतवणूकदारांना मोठा नफा कमावून दिलाय. हे चारही शेअर्स कॅपिटल गुड्स सेक्टरचे आहेत.
भारत हेवी इलेक्ट्रिकल (Bharat Heavy Electricals)
कॅपिटल गुड्स क्षेत्रातील पहिला स्टॉक भारत हेवी इलेक्ट्रिकलचा आहे. गेल्या एका महिन्यात, भारत हेवी इलेक्ट्रिकल्सच्या स्टॉकनं त्यांच्या गुंतवणूकदारांना 15 टक्के परतावा दिलाय. स्टॉकचा नवीन 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 99.53 रुपये आहे.
सुझलॉन एनर्जी (Suzlon Energy)
सुझलॉन एनर्जी हा कॅपिटल गुड्स क्षेत्रातील आणखी एक स्टॉक आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे 37 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सुझलॉन एनर्जीच्या शेअरनंदेखील 20.8 रुपयांच्या 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठलाय.
जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर (GMR Airports Infrastructure)
तिसरा स्टॉक जीएमआर एअरपोर्ट इन्फ्रास्ट्रक्चरचा आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे 14 टक्क्यांची तेजी दिसून आली आहे. स्टॉकचा नवीन 52 आठवड्यांचा उच्चांक 49.2 रुपये आहे.
थरमॅक्स (Thermax)
कॅपिटल गुड्स क्षेत्रातील शेवटचा स्टॉक थरमॅक्स कंपनीचा आहे. गेल्या एका महिन्यात या शेअरमध्ये सुमारे 19 टक्क्यांची वाढ झाली आहे. याशिवाय, शेअरनं 2727.05 रुपयांच्या नव्या 52 आठवड्यांच्या उच्चांकालाही स्पर्श केलाय.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)