शुक्रवारी संपलेल्या कामाकाजानंतर इक्विटी मार्केटमध्ये मोठी वाढ झाली. यादरम्यान सेन्सेक्स, निफ्टीने अनेक नवे विक्रम रचले. या कालावधीत किमान 68 स्मॉलकॅप शेअर्सनं दुहेरी अंकी परतावा दिला. यापैकी चार शेअर्सनं 25 टक्क्यांहून अधिक परतावा दिलाय. गुंतवणूकदारांना चांगला परतावा देण्याच्या बाबतीत डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज अव्वल स्थानावर आहे. या शेअरनं जवळपास 32 टक्के परतावा दिला.
डीसीएम श्रीराम इंडस्ट्रीज नंतर स्टर्लिंग आणि विल्सनचा क्रमांक येतो. या शेअरनं सोमवार आणि शुक्रवार दरम्यान गुंतवणूकदारांना 26.6 टक्के परतावा दिला. याच कालावधीत अरिहंत कॅपिटलनं 26.55 टक्के परतावा दिला आहे. त्याचप्रमाणे डीबी कॉर्पने 25.03 टक्के परतावा दिला. मिष्टान फूड्स, जय बालाजी इंडस्ट्रीज, आशापुरा मिनीकेम, नुगेन सॉफ्टवेअर, जागरण प्रकाशन आणि एलटी फूड्स सारख्या समभागांनी या कालावधीत गुंतवणूकदारांना 20-25 टक्के मजबूत परतावा दिला.
या शेअर्सनं केली कमाल
या कालावधीत सेरेब्रा इंटिग्रेटेड टेक्नॉलॉजीजनं २४ टक्के, डोडला डेअरी लिमिटेडनं 24 टक्के, इलेक्ट्रॉनिक्स मार्ट इंडियानं 23 टक्के, टेक्समॅको इन्फ्रास्ट्रक्चर अँड होल्डिंग्सने 22 टक्के आणि हेरिटेज फूड्सने 21 टक्के रिटर्न दिले. याच कालावधीत जिंदाल सॉ नं 20 टक्के, रिलायन्स इन्फ्रानं 20 टक्के, प्रिसोलनं 19 टक्के, अग्रवाल इंडस्ट्रीजनं 18 टक्के आणि जीटीपीएल हॅथवेनं 18 टक्के रिटर्न्स दिले आहेत.
मिडकॅप शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास, केवळ पॉलीकॅब, एम्फसिस आणि युनियन बँकेच्या शेअर्सनं दुहेरी अंकांची उसळी घेतली. पॉलीकॅबमध्ये 18.3 टक्के, एमफेसिस 12 टक्के आणि युनियन बँकेच्या शेअरनं 11 टक्क्यांची उसळी घेतली.
सेन्सेक्सच्या या शेअर्सची कमाल
सेन्सेक्समधील शेअर्सबद्दल बोलायचं झाल्यास, कोटक महिंद्रा बँक आणि एसबीआयच्या समभागांमध्ये सर्वात मोठी उसळी दिसून आली. यानंतर लार्सन अँड टुब्रो आणि एनटीपीसीच्या शेअर्सनं तेजी नोंदवली.
(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)