बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या पतंजली फूड्स कंपनीचा (Patanjali Foods Ltd) चौथ्या तिमाहीचा निकाल आला असून कंपनीला छफ्फरफाड नफा मिळाला आहे. पतंजली फूड्स लिमिटेड (PFL), खाद्यतेल आणि दैनंदिन वापराच्या वस्तू बनवते. मार्च 2023 ला संपलेल्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 12 टक्क्यांची वाढून 263.7 कोटी रुपयांवर पोहोचला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कंपनीचा निव्वळ नफा 234.43 कोटी रुपये एवढा होता.
एका नियामकीय माहितीनुसार, गेल्या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 7,962.95 कोटी रुपये झाले. जे यापूर्वीच्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत 6,676.19 कोटी रुपये होती. आर्थिक वर्ष 2022-23 दरम्यान कंपनीचा शुद्ध नफा या पूर्वीच्या आर्थिक वर्षापेक्षा 806.30 कोटी रुपयांनी वाढून 886.44 कोटी रुपये झाला. आर्थिक वर्ष 2021-22 च्या 24,284.38 कोटी रुपयांच्या तुलनेत समीक्षाधीन आर्थिक वर्षात कंपनीचा एकूण नफा वाढून 31,821.45 कोटी रुपये झाला आहे. पतंजली फूड्स ने म्हटल्याप्रमाणे, एकूण महसुलात FMCG व्यवसायाचा वाटा आर्थिक वर्ष 2021-22 च्या 1,683.24 कोटी रुपयांच्या तुलनेत वाढून 6,218.08 कोटी रुपये झाला आहे.
300% डिव्हिडंड देण्याची शिफारस -
पतंजली फुड्स लिमिटेडच्या बोर्डाने मार्च 2023 ला संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रत्येक 2 रुपयांच्या फेस व्हॅल्यूवर 6 रुपये अर्थात जवळपास 300 टक्के लाभांशा अथवा डिव्हिडंड देण्याची शिफासर केली आहे. एफएमसीजी कंपनीने मार्च तिमाहीत 416 कोटी रुपयांचा EBITDA नोंदवला आहे. एक वर्षापूर्वी, हा 418 कोटी रुपये होता. तसेच चौथ्या तिमाहीत तिप्पट महसूल वाढून 1805 कोटींवर आला आहे. एक वर्षांपूर्वी हा 452 कोटी रुपये होता.
शेअरमध्ये 7 टक्क्यांहून अधिकची उसळी -
पतंजली फुड्स लिमिटेडच्या (Patanjali Foods Ltd) शेअरमध्ये काल 7 टक्क्यांहून अधिकची उसळी दिसून आली. हा शेअर काल वाढीसह 1023 रुपयांवर क्लोज झाला होता. एक दिन आधीच्या तुलनेत शेअरमध्ये 1 टक्क्यांपर्यंतची उसळी दिसून आली आहे. या शेअरचा 52 आठवड्यांतील उच्चांक 1495 रुपये सप्टेंबर 2022 मध्ये शेअर या पातळीवर पोहोचला होता.
(टीप येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)