Join us  

SBI चे ATM लावणार ही कंपनी, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या; गुंतवणूकदारांची चांदी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 3:52 PM

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात चढउतार दिसून आला.

आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी शेअर बाजारात चढउतार दिसून आला. दरम्यान, काही कंपन्यांशी संबंधित सकारात्मक बातम्यांमुळे कंपनीच्या शेअर्समध्ये वाढ नोंदवण्यात आली. अशीच एक कंपनी एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिडटे (AGS Transact Technologies Limited) आहे. शुक्रवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये 13 टक्क्यांची वाढ झाली आणि शेअरची किंमत 69.79 रुपयांवर पोहोचली. मात्र, व्यवहाराच्या शेवटी प्रॉफिट बुकिंगही दिसून आलं. असं असूनही कंपनीचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये होते. शेअर्समध्ये या वाढीचं कारण कंपनीशी संबंधित एक सकारात्मक बातमी आहे.कंपनीला स्टेट बँक ऑफ इंडियासाठी (SBI) तिच्या बँकिंग ऑटोमेशन सोल्यूशन्स पोर्टफोलिओ अंतर्गत 1,350 एटीएम पुरवण्याची ऑर्डर मिळाली आहे. ऑर्डरनुसार, SBI या आर्थिक वर्षात संपूर्ण भारतभर 'AGS' ब्रँडेड एटीएम स्थापित करणार आहे. कंपनीने शेअर बाजाराला यासंदर्भातील माहिती दिली. या ऑर्डरमुळे बँकिंग ऑटोमेशन सोल्यूशन्स सेगमेंटसाठी आमची टॉपलाइन मजबूत करण्यात मदत होईल. ऑर्डरमध्ये बँकिंग ऑटोमेशन सोल्यूशन्सची विक्री तसंच वार्षिक देखभाल कराराचा समावेश आहे.यापूर्वी काय केलं?अलीकडेच एजीएस ट्रान्झॅक्ट टेक्नॉलॉजीज लिमिडटेनं पंजाब नॅशनल बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियासाठी 8,000 ATM/CRM ची ऑर्डर पूर्ण केली आहे. 30 सप्टेंबर 2023 पर्यंत, कंपनीनं देशातील 2,200 शहरे आणि शहरांमध्ये 77,658 एटीएम/सीआरएम स्थापित, व्यवस्थापित किंवा त्याची देखरेख करण्याचं काम केलं आहे.

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक